शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 9 मे 2020 (09:30 IST)

कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या येत्या पंधरा ते वीस दिवसात कमी होईल : आरोग्य मंत्री राजेश टोपे

मुंबईतली कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या येत्या पंधरा ते वीस दिवसात कमी होईल, असा विश्वास आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. ते पीटीआयशी बोलत होते.
 
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल हे काल मुंबईत परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते. कंटेन्मेंट झोनच्या सीमा बंद कराव्यात, तसंच बाधितांचा शोध-चाचणी आणि उपचार या त्रिसूत्रीचा प्रभावी वापर करावा, असं अग्रवाल यांनी सांगितल्याची माहिती टोपे यांनी दिली.
 
कमीत कमी वेळात जास्तीत जास्त चाचण्या कराव्या, बाधित रुग्ण शोध घेऊन त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्याची सूचनाही अग्रवाल यांनी केल्याचं टोपे यांनी सांगीतलं. राज्यातल्या एकूण १७ हजार ९७४ रुग्णांपैकी ११ हजार ३९४ रुग्ण मुंबईतले आहेत.