राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याची संख्या पोहोचली अडीच लाखांवर
राज्यात कोरोनाचे गुरुवारी ८८६० रुग्ण बरे होऊन घरे गेले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांचं एकूण संख्या २ लाख ४८ हजार ६१५ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६०.३७ टक्के आहे. गुरुवारी ११,१४७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ४८ हजार १५० रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
पाठविण्यात आलेल्या २० लाख ७० हजार १२८ नमुन्यांपैकी ४ लाख ११ हजार ७९८ नमुने पॉझिटिव्ह (१९.८९ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ४ हजार १४१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४० हजार ५४६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २६६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५८ टक्के एवढा आहे.