1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. ओळख क्रिकेटपटूंची
Written By राकेश रासकर|

जवागल श्रीनाथ

नाव :जवागल श्रीनाथ
जन्म : ३१ ऑगस्ट १९६९
ठिकाण : म्हैसूर, कर्नाटक
देश : भारत
कसोटी पदार्पण : भारत वि. ऑस्ट्रेलिया, ब्रिस्बेन, १९९१
वन डे पदार्पण : भारत वि. पाकिस्तान, शारजा, १९९१
शैली : मध्यमगती गोलंदाज व उजव्या हाताचा फलंदाज

भारताचा सर्वांत वेगवान गोलंदाज म्हणून जवागल श्रीनाथला ओळखले जाते. त्याने सर्वांत जास्त म्हणजे १५७ किलोमीटर प्रति तासानेही चेंडू टाकला आहे. कपिल देवनंतर तोच भारताचा असा वेगवान गोलंदाज आहे की ज्याने कसोटीत २०० हून जास्त बळी घेतले आहेत. प्रथम दर्जाच्या सामन्यात त्याने पदार्पणात हॅटट्रिक केली होती.

पदार्पणाच्या कसोटीत त्याने पहिल्या डावात ३ तर दुसर्‍या डावात ७ बळी मिळवले. मात्र, तीन वेगवान गोलंदाज खेळवायचे नाही व फिरकीला प्राधान्य द्यायचे यामुळे त्याला अनेकवेळा संघाबाहेर बसावे लागले. १९९४ मध्ये कपिल देव निवृत्त झाल्यानंतर त्याला पुन्हा संधी मिळाली. त्याने पुनरागमनातच वेस्ट इंडीजविरूध्द ५ बळी ‍व ६० धावा काढत भारताला विजय मिळवून दिला. त्यानंतर त्याचे संघतील स्थान पक्के झाले. तो संघाचा नियमित गोलंदाज ठरला.

२००३ च्या विश्वकरंडकात भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचण्यात श्रीनाथने महत्वाचा वाटा उचलला. या स्पर्धेनंतर त्याने निवृत्ती घेतली. २००६ मध्ये त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सामनाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

कसोटी
सामने - ६७
धावा - १००९
सरासरी - १४.२१
सर्वोत्तम- ७६
१००/५० - 0/ ४
झेल - २२
बळी - २३६
सर्वोत्तम- ८/८६

वन डे
सामने - २२९
धावा - ८३३
सरासरी - १०.६३
सर्वोत्तम- ५३
१००/५० -०/१
झेल - ३२
बळी - ३१५
सर्वोत्तम - ५/२३.