सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By

भाऊबीज 2023 कधी आहे, 14 की 15 नोव्हेंबरला?

Bhai Dooj 2023 दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीला भाऊबीज हा सण साजरा केला जातो. रक्षाबंधनाप्रमाणेच हा सणही भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचे प्रतीक आहे. याला भैया दूज, भाई टिका, यम द्वितीया असेही म्हणतात. भाऊबीजच्या दिवशी बहिणी आपल्या भावाचे औक्षण करतात आणि त्याच्या दीर्घायुष्याची कामना करतात. तसेच भाऊही बहिणींना भेटवस्तू देतात आणि त्यांना निरोगी आयुष्यासाठी आशीर्वाद देतात.
 
भाऊबीज 2023 कधी आहे ?
कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीया तिथीचे शुभारंभ 14 नोव्हेंबर मंगलवारी दुपारी 2 वाजून 36 मिनिटापासून होईल तर याचे समापन 15 नोव्हेंबर रोजी बुधवारी दुपारी 1 वाजून 47 मिनटाला होईल. अशात उदया तिथीप्रमाणे भाऊबीज 15 नोव्हेंबर रोजी साजरा केली पाहिजे परंतू शोभन योगामध्ये भाऊबीजेचं औक्षण केलं जातं.

तर शोभन योग यंदा 14 नोव्हेंबर रोजी असल्याने या योगात औक्षण करु इच्छित लोकांनी 14 नोव्हेंबर रोजी भाऊबीज साजरा करावी. तर तिथीप्रमाणे औक्षण करणार्‍यांनी 15 नोव्हेंबर रोजी हा सण साजरा करावा. यावर्षी भाऊबीज पूजा आणि औक्षण करण्यासाठी हे दोन्ही दिवस शुभ असतील.
 
भाऊबीज 2023 औक्षण मुहूर्त
14 नोव्हेंबर रोजी भाऊबीज औक्षण करण्यासाठी शुभ मुहूर्त दुपारी 1 वाजून 10 मिनिटापासून ते दुपारी 3 वाजून 19 मिनिटापर्यंत आहे. तर 15 नोव्हेंबर रोजी शुभ मुहूर्त सकाळी 10 वाजून 45 मिनिटापासून ते दुपारी 12 वाजून 5 मिनिटापर्यंत राहील.
 
भाऊबीज 2023 पूजा विधी
भाऊबीज यादिवशी भावांनी सकाळी स्नान करून विवाहित बहिणीच्या घरी जावे. त्याचबरोबर अविवाहित मुलींनी आपल्या भावाला घरी औक्षण लावावे. भाऊबीजेच्या दिवशी बहिणीने भावासाठी जेवण तयार करावे. त्यानंतर बहिणीने भावाला औक्षण करावे. बहिणीने भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी आणि भावाने बहिणीला दीर्घायुष्य मिळावे यासाठी प्रार्थना करावी. यानंतर भावाने बहिणीला भेटवस्तू द्यावी.
 
भाऊबीज 2023 महत्व 
भाऊबीजच्या संदर्भात एक मत आहे की या दिवशी जे बंधू-भगिनी एकत्र पूजा करतात त्यांच्या जीवनात आनंद येतो. भावा-बहिणीचे जीवन सुख, समृद्धी, आणि आरोग्याने भरलेले असते. याशिवाय माता यमुना आणि यमराज यांचाही आशीर्वाद प्राप्त होतो त्यामुळे भाऊ बहिणीला दीर्घायुष्य लाभते.