गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By

Fan Cleaning Hacks कमी वेळात आणि कमी खर्चात चमकवा पंखा

Fan Cleaning Hacks दिव्यांचा सण दिवाळी अनेक आनंद घेऊन येतो. तो सर्वत्र मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दिवाळीच्या काही दिवस आधीपासून लोकांची तयारी सुरू होते. खरेदीबरोबरच लोक घरांची साफसफाई करण्यातही गुंततात. यात सर्वात महत्त्वाची क्लिनिंग म्हणजे पंख्यांची सफाई.
 
पाणी किंवा कापडाच्या साहाय्याने धुळीचा पंखा कितीही वेळा चमकवण्याचा प्रयत्न केला तरी तो पूर्णपणे स्वच्छ ही होत नाही आणि चमकत देखील नाही. पंखा साफ करणे हे एखाद्या मोठ्या कामापेक्षा कमी नाही. जर तुमच्यासाठीही घराची साफसफाई करताना पंखा साफ करणे हे सर्वात कठीण काम असेल, तर चला जाणून घेऊया अगदी कमी खर्चात पंखा आरशासारखा कसा स्वच्छ करू शकता?
 
अनेकदा आपण गलिच्छ पंखा स्वच्छ करण्यासाठी सुती कापड वापरला जाततो. सूती कापड पाण्यात भिजवून पंखा साफ करायचा हे सर्वांनाच माहीत आहे, पण साफ केल्यावर लगेच धूळ जमते. अशात तुम्ही पंखा साफ करण्यासाठी हा उपाय अमलात आणू शकता.
 
कमी खर्चात गलिच्छ पंखा साफ करा
पंख्यावर साचलेली घाण साफ करण्यासाठी तुम्ही व्हिनेगर आणि बेकिंग सोडा वापरू शकता. या दोन्ही वस्तू अगदी सहज उपलब्ध असतात. स्वयंपाकघरातील या वस्तूंनी पंखा सहज साफ करता येतो. 
 
व्हिनेगर आणि बेकिंग सोडासह पंखा कसा स्वच्छ करावा?
पंखा स्वच्छ करण्यासाठी व्हिनेगर आणि बेकिंग सोडा मिसळा. ब्रशच्या मदतीने पंखा स्वच्छ करा. त्यानंतर सुती कापडाच्या मदतीने स्वच्छ करा. अशा रीतीने पंख्यातील सर्व घाण निघून जाईल आणि पंखा चमकू लागेल.