रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. दिल्ली विधानसभा निवडणूक 2020
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 3 फेब्रुवारी 2020 (15:42 IST)

दिल्ली विधानसभा निवडणूक : सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या 51 टक्के उमेदवारांवर गुन्हे दाखल

विधानसभा निवडणूक जवळ येत असतानाच राजकीय पक्षांशी संबंधित एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. विधानसभा निवडणूक लढवणार्‍या एकूण 672 उमेदवारांपैकी 20 टक्के (133) उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे, सत्ताधारी आम आदमी पक्षाचे 51 टक्के उमेदवारांवर गुन्हे आहेत.
 
असोसिएशन ऑफ डोमॅक्रॅटिक रिफॉर्म (एडीआर)च्या अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे. या संस्थेच्या अहवालानुसार, दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे 25 टक्के उमेदवार आणि भाजपच 20 टक्के उमेदवारांनी निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्याविरोधात गंभीर गुन्हे असल्याचे नमूद केले आहे. काँग्रेसच्या 15 टक्के उमेदवारांनीही आपल्याविरोधात गंभीर गुन्हे दाखल असल्याचे प्रतिज्ञापत्रात जाहीर केले आहे. दरम्यान, 8 फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. 672 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आपच्या 36 उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल आहेत. तर भाजपच 67 पैकी 17 उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल आहेत. यामध्ये काँग्रेस तिसर्‍या, तर बसप चौथ स्थानी आहे.