रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. ऑनलाईन दिवाळी अंक
Written By वेबदुनिया|

फराळाची पंगत

सौ. शोभना अनगळ

WD
दिवाळीच्या दिवशी झाली गंमत
ताटात बसली फराळाची पंगत
करंजी म्हणते फुगले पोट
शंकरपाळ्यांनी दुमडले ओठ।
पिऊन पिऊन तूप झाली गालफुगी
चिरोटेवर बसले पटदिशी उगी।
चकली ताईंना आला सरसरून काटा
हंसून म्हणतो अनारसा पेढे वाटा
तक्ररी आणि गार्‍हाणी ऐकून ऐकून
कडबोळे म्हणतो कान गेले विटून।
गोल ढेरी सावरत लाडूराव आले
पाहुणे म्हणतात खाऊन खाऊन पोट फुगले।