Marathi Biodata Maker
✕

Grape Juice उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला थंडावा देण्यासाठी उत्तम पर्याय द्राक्षाचे ज्यूस

Updated: शुक्रवार, 27 मार्च 2026 (17:56 IST)
 
साहित्य-
२ वाट्या ताजी द्राक्षे (काळी किंवा हिरवी)
१ चमचा साखर किंवा मध (द्राक्षे आंबट असल्यास)
अर्धा चमचा चाट मसाला किंवा काळे मीठ (चवीनुसार)
थोडा पुदिना (ऐच्छिक)
बर्फाचे तुकडे
 
कृती-
सर्वात आधी द्राक्षे मिठाच्या पाण्यात १०-१५ मिनिटे भिजवून ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या, जेणेकरून त्यावरील औषधे किंवा कचरा निघून जाईल. मिक्सरच्या भांड्यात द्राक्षे, साखर/मध, काळे मीठ आणि पुदिना एकत्र करून बारीक वाटून घ्या. तयार झालेले मिश्रण एका गाळणीने गाळून घ्या (जर तुम्हाला फायबर हवे असेल तर न गाळताही पिऊ शकता). ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे टाकून थंडगार ज्यूस सर्व्ह करा.
 
द्राक्षाच्या ज्यूसचे फायदे
हृदयासाठी उत्तम: द्राक्षांमध्ये असलेल्या अँटी-ऑक्सिडंट्समुळे रक्ताभिसरण सुधारते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
त्वचेसाठी फायदेशीर: यामध्ये 'व्हिटॅमिन सी' भरपूर असल्याने त्वचेवर नैसर्गिक चमक येते.
पचनशक्ती सुधारते: बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास द्राक्षाचा रस पिणे गुणकारी ठरते.
झटपट ऊर्जा: थकवा जाणवत असल्यास एक ग्लास द्राक्षाचा रस प्यायल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Green apple juice आरोग्यवर्धक हिरव्या सफरचंदाचे ज्यूस
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: Summer Special Juice Recipes घरी बनवलेले हे नैसर्गिक ज्यूस नक्कीच ट्राय करा

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

Happy Dhanteras Wishes 2026 images

Abhyanga Snan 2026 Wishes in Marathi नरक चतुर्दशीच्या अभ्यंगस्नान शुभेच्छा

दिवाळीत पाहुण्यांसाठी १५ मिनिटांत तयार करा केशर-पिस्ता श्रीखंड; सणाच्या जेवणाला खास रंगत

कोलेस्ट्रॉल वाढण्याचे लक्षण हातावर दिसू शकतात,दुर्लक्ष करू नका

पीएचडी नॅनोटेक्नॉलॉजी मध्ये करिअर बनवा पात्रता, व्याप्ती जाणून घ्या

पुढील लेख
Show comments