गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. ग्लासातल्या ग्लासात
Written By

क्यूकंबर आणि मिंट लस्सी

साहित्य : 250 ग्रॅम दही, 1 काकडी, अर्धा कप पुदिना (बारीक चिरलेला), 1 चमचा हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या, 1 चमचा आल्याचा किस, मीठ चवीप्रमाणे, 1 मोठा चमचा साखर, बर्फ आवश्यकतेनुसार. 
 
कृती : काकडी सोलून त्याचा किस करून घ्यावा. नंतर ब्लँडरमध्ये दही, आलं, पुदिना, हिरव्या मिरच्या, मीठ, साखर व किसलेली काकडी टाकून चांगले एकजीव करावे. बर्फ टाकून परत एकदा फिरवावे. लस्सी तयार आहे. या लस्सीला ग्लासमध्ये घालून वरून पुदिनाच्या पानांनी सजवावे, ही स्वादिष्ट लस्सी सर्वांनाच खूप पसंत पडेल.