वर्षातले पहिले छायाकल्प चंद्रग्रहण आज दिसणार
नवीन वर्षांचे पहिले छायाकल्प चंद्रग्रहण आज अर्थात शुक्रवारी १० जानेवारीला होत आहे. या वेळी हे चंद्रग्रहण भारतातूनही दिसणार आहे. हे चंद्रग्रहण मध्यरात्री २.४२ वाजता विशेष चष्म्याऐवजी उघडय़ा डोळ्यांनीदेखील पाहू शकता येईल.
रात्री १०.३८ वाजता चंद्रबिंब पृथ्वीच्या विरळ छायेमध्ये येण्यास सुरुवात होणार आहे. त्यानंतर, १२.४० वाजता ८९ टक्के चंद्रबिंब पृथ्वीच्या विरळ छायेमध्ये प्रवेश करणार आहे. या वेळी मध्यरात्री २.४२ वाजता संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या विरळ छायेतून बाहेर पडणार आहे. या चंद्रग्रहणाला ‘वोल्फ मून एकल्प्सि’ असे म्हणतात. हे ग्रहण आशिया, ऑस्ट्रेलिया, युरोप, आफ्रिका, उत्तर अमेरिका, पूर्व साऊथ आफ्रिका येथेही दिसेल.