रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. उपवासाचे पदार्थ
Written By

चमचमीत भगर

Barnyard Millet
How to make Bhagar Recipe
साहित्य
1 कप भगर
2-3  हिरव्या मिरच्या चिरलेल्या किंवा चवीनुसार
2 टीस्पून जिरे
2 बटाटे सोलून चिरून
3 कोकम तुकडे
3 टेबलस्पून भाजलेले शेंगदाण्याचा कूट
2 टेबलस्पून तूप
आवश्यकतेनुसार पाणी
अर्धा टीस्पून साखर ऐच्छिक
मीठ चवीनुसार
कोथिंबीर बारीक चिरून गार्निशसाठी
 
How to make Bhagar Recipe
भगर रेसिपी बनवण्‍यासाठी, प्रथम भगर कोरडी मंद आचेवर भाजून घ्या. एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवा.
त्याच कढईत तूप गरम करा. जिरे घाला आणि हिरवी मिरची घालून काही सेकंद परता.
काही सेकंदांनंतर त्यात चिरलेला बटाटा, शेंगदाण्याची पूड, कोकम घालून सर्वकाही व्यवस्थित मिसळा.
2 ते 3 मिनिटांनी पाणी, मीठ, साखर घालून उकळी आणा.
पाण्याला उकळी आली की, सतत ढवळत भाजकी भगर घाला.
झाकण ठेवून मध्यम आचेवर सुमारे 10-12 मिनिटे चांगले मऊ होईपर्यंत शिजवा.
गॅस बंद करा आणि आणखी काही मिनिटे झाकून ठेवा. पुन्हा एकदा मिसळा.
कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा.
भगर सोबत साधे दही, टोमॅटो कांदा काकडी रायता किंवा तुमच्या आवडीचे कोणतेही रायते आणि आमटी सोबत देऊ शकता.