Daily Horoscope
✕

हेलिकॉप्टर ईलाच्या निमित्ताने

Updated: शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018 (16:52 IST)
 
काजोल म्हणते, चित्रपटाचे लेखक आनंद गांधी आणि मितेश शहा माझ्याकडे ही कथा घेऊन आले होते. आपल्याकडे अशा प्रकारची कथा असल्याचं त्यांनी मला सांगितलं. ही कथा मी ऐकावी अशी त्यांची इच्छा होती. त्यानुसार मी ती ऐकली. मला ही कथा प्रचंड आवडली. हे काही तरी वेगळं आहे आणि मला हा चित्रपट करायला खूप आवडेल असं एका क्षणात वाटून गेलं. अजयही त्यावेळी तिथे होता. मला ही कथा खूप आवडल्याचं कळल्यानंतर तोही या चर्चेत सामील झाला. तुला ही कथा खूप आवडली असेल तर आपण चित्रपटाची निर्मिती करू, असं त्याने मला सांगितलं. यामुळे मी खूप खूश झाले. ही कथा ऐकल्यानंतर मी लगेचच प्रतिक्रिया दिली. हा चित्रपट मी करणार असल्याचं सांगून टाकलं. इतरांचा विचारही करू नका, असंही स्पष्ट केलं.
 
चित्रपटाच्या कथेबद्दल काजोल म्हणते की, यात फक्त हेलिकॉप्टर पॅरेंटिंग ही संकल्पना घेतलेली नाही तर अजून बरंच काही आहे. यातली ईला खूप विनोदी आहे. चित्रपटात विनोदही आहे. सोबतच यातून संदेश देण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे. मुलाचं आपल्या आईसोबतचं नातं यात दाखवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या आईने मुलाला एकटीने वाढवलं आहे. त्यामुळे तिचे त्याच्यासोबत विशेष ऋणानुबंध आहेत. अशा परिस्थितीत आई आणि मुलाचं नातं खूप गहिरं असतं. त्याला बरेच कंगोरे असतात. आईने केलेली ढवळाढवळ मुलांना आवडत नाही. पण त्याच वेळी आईबद्दल काहीही ऐकून घ्यायला ही मुलं तयार नसतात. आईच्या पाठीशी ही मुलं उभी राहतात. ईला आणि तिच्या मुलामध्ये अशा प्रकारचं नातं निर्माण झालं आहे. तेच तुम्हाला 'हेलिकॉप्टर ईला'मध्ये पाहता येईल. अत्यंत संवेदनशील, हळवा पण मनापासून हसवणारा असा हा चित्रपट पालक आणि मुलं दोघांनाही खूप आवडेल, अशी मला खात्री आहे.
 
नितीन शिंदे 

सर्व पहा

माझ्या वैयक्तिक आयुष्याचा तमाशा करू नका," कोमल राणीसोबतच्या अफेअरच्या अफवांवर गोविंदानी मौन तोडले

इंडियन आइडल 17:हिमेश रेशमिया सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये परतणार, निर्मात्यांनी मोठी घोषणा केली

सिंगापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आमिर खानचा सन्मान होणार, या चित्रपटाला 'स्क्रीन आयकॉन' पुरस्काराने सन्मानित केले जाणार

ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन

Hurun Rich List 2026: संपत्तीत लक्षणीय घट होऊनही शाहरुख खान भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता, अमिताभ बच्चन दुसऱ्या क्रमांकावर

सर्व पहा

माझ्या वैयक्तिक आयुष्याचा तमाशा करू नका," कोमल राणीसोबतच्या अफेअरच्या अफवांवर गोविंदानी मौन तोडले

इंडियन आइडल 17:हिमेश रेशमिया सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये परतणार, निर्मात्यांनी मोठी घोषणा केली

हिरवीगार जंगले, नद्या आणि धबधबे निसर्गप्रेमींचे नंदनवन ''अरुणाचल प्रदेश''

गोविंदाच्या कोमल राणीसोबतच्या संबंधांमुळे राखी सावंत ने गोविंदाला खडसावले

सिंगापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आमिर खानचा सन्मान होणार, या चित्रपटाला 'स्क्रीन आयकॉन' पुरस्काराने सन्मानित केले जाणार

पुढील लेख
Show comments