रविवार, 12 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By वेबदुनिया|

गणेश पूजेसाठी आवश्यक साहित्य

गणपती पूजनासाठी खालील साहित्य हवे.
गणपती मूर्ती, कापूर एक श्रीफळ, रेशीम किंवा पुष्पमाळा, फुले व हार, दुर्वा, अगरबत्तीचा एक पुडा, इत्राची लहान बाटली, जानवे, पाच ग्रॅम लवंग किंवा पानाचा विडा, दोरा, मिठाई-मोदक, मावा मिठाई, बंगाली मिठाई इत्यादी, वस्त्र किंवा उपवस्त्र फळ, केळी, चिकू, सफरचंद चंदन पावडर गुलाल, हळद, कुंकु, शेंदूर सुपारी 12 नग. 
घरात उपलब्ध असलेली सामग्री  
पाण्यासाठी तांब्या किंवा लोटा देवासाठी पाट, चौरंग स्वतःला बसण्यासाठी आसन

तीन नग दिवे: 1. मोठा (पूजा सुरू करताना) 2. छोटा (पूजनाच्या मध्यात) 3. मध्यम (आरतीसाठी)
दोन पराती  : 1. देवाला स्नान घालण्यासाठी 2. पूजन सामग्री ठेवण्यासाठी
तीन नग थाळी : नैवद्य, पुष्पमाळा ठेवण्यासाठहात धुण्यासाठी दोन ताम्हण
तीन पात्रे : 1. लोटा 2. पळी 3. ताम्हन

हात पुसण्यासाठी फडके
देवाचे अंग पुसण्यासाठी फडके
कापसाची वात
चार लहान वाट्या
चंदन
घरून किवा बाजारातून आणावी लागणारी सामग्री  
कच्चे दूध, दही, शुद्ध तूप, साखर, मध 50 ग्रॅम, अक्षता.

गणेश पूजनासाठी पत्री 

गणपतीला दूर्वा सर्वाधिक प्रिय आहे. तीन किंवा पाच पाने असलेली दूर्वा श्रेष्ठ मानली जाते.

गणपतीला मोदक अतिप्रिय आहेत. विविध प्रकारचे मोदक अर्पण केले पाहिजेत.

जे निषिद्ध नाहीत अशी विविध प्रकारची फुले गणपतीला अर्पण करता येतात.

कोणतेही ताजे फळ अर्पण केले जाऊ शकते.

गणेश पूजनासाठी निषिद्ध वस्तू 

तुळशी किंवा तुळशीचे पान गणपतीला अर्पण करत नाहीत.

गणपतीला एकच प्रदक्षिणा घाला.

घरात दोनपेक्षा अधिक मूर्ती नको.

गणपतीची जुनी किंवा तुटलेली मूर्ती ठेवू नका

अनेक दिवसात पूजा न केलेली मूर्ती ठेवणे निषिद्ध.

अपूर्ण दूर्वा अर्पण करू नये.