गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. देव-देवता
Written By
Last Updated : शनिवार, 26 ऑक्टोबर 2024 (08:31 IST)

Shani Dev: शनिवारी या 5 शक्तिशाली मंत्राचा करा जप, शनिदेवांचा मिळेल आशीर्वाद

shani
Shani Dev 5 Powerful Mantras : शनिदेव न्याय आणि कर्मफळचे दाता म्हणून ओळखले जतात. असे मानले जाते की, शनि देव सर्वांना वाईट कर्मांची फळे देतात. सोबतच सर्व कष्टांपासून मुक्ती पण देतात. पण यासाठी शनिदेवांना प्रसन्न करावे लागते. ज्योतिषशास्त्र मध्ये शनिदेवला प्रसन्न करण्यासाठी काही मंत्राचा जप सांगितला आहे. जर तुम्ही त्या मंत्राचा जप केला तर शनिदेवांचा आशीर्वाद नेहमी तुमच्या सोबत राहिल. ज्योतिषांच्या मते, या मंत्राचा जप केल्याने असाध्य रोगांपासून मुक्ती मिळते. सोबतच नौकरी आणि व्यवसाय मध्ये देखील प्रगती होते. तर चला जाणून घ्या शनिदेवांच्या या 5 सर्वात शक्तिशाली मंत्रांबदल 
 
1. शनि देव बीज मंत्र
“ओम प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः
 
2. शनि आरोग्य मंत्र जप
“ध्वजिनी धामिनी चैव कंकाली कलहप्रिहा
कंकटी कलही चाउथ तुरंगी महिषी अजा”
“शनैर्नामानि पत्नीनामेतानि संजपन् पुमान्।
दुःखानि नाश्येन्नित्यं सौभाग्यमेधते सुखमं”
 
3. शनि दोष निवारण मंत्र
“ओम त्रयम्बकं यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम
उर्वारुक मिव बन्धनान मृत्योर्मुक्षीय मा मृतात”
“ओम शन्नोदेवीरभिष्टय आपो भवन्तु पीतये शंयोरभिश्रवन्तु नः
ओम शं शनैश्चराय नमः”
 
4. शनि गायत्री मंत्राचा जप
“ओम भगभवाय विद्महैं मृत्युरुपाय धीमहि तन्नो शनिः प्रचोद्यात्”
 
5. शनि देव महामंत्र
“ओम निलान्जन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम
छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम”
 
शनिदेवांचा मंत्र जप करण्याची योग्य विधि 
ज्योतिषांच्या मते, जेव्हा पण शनिदेवांच्या मंत्राचा जप करत असाल तेव्हा सर्वात आधी अंघोळ करावी. त्यानंतर काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून घराजवळील शनि मंदिरात जावून. पूजा केल्यानंतर शनिदेवांवर निळ्या रंगाचे फूल अर्पित करावे. मंदिर मध्ये पूजा केल्यावर घर यावे आणि कुशचे आसन टाकून त्यावर बसून शनिदेवाच्या मंत्राचा जप करा. हा मंत्र शनिवारी जपल्यास चांगले असते. तसेच घरात सुख, संपत्ती, आरोग्य नांदते.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्यमाहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik