शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : बुधवार, 3 एप्रिल 2019 (13:57 IST)

नारळाशी निगडित 10 महत्त्वाच्या गोष्टी

आम्हाला सर्वांना माहितत आहे की पूजेत नारळाचे फार महत्त्व आहे. कुठल्याही देवी देवतांची पूजा नारळाशिवाय अपुरी आहे. देवाला नारळ अर्पित केल्याने धन संबंधी सर्व समस्या दूर होण्यास मदत मिळते आणि प्रसादाच्या रूपात नारळाचे सेवन केल्याने शारीरिक दुर्बळता दूर होते. येथे जाणून घेऊ नारळाशी निगडित खास 10 गोष्टी …
 
1. नारळाला श्रीफल देखील म्हटले जाते. असे मानले गेले आहे की जेव्हा विष्णूने पृथ्वीवर अवतार घेतला होता तेव्हा ते आपल्यासोबत ह्या तीन वस्तू - लक्ष्मी, नारळाचे वृक्ष आणि कामधेनू घेऊन आले होते.

2. नारळाच्या वृक्षाला कल्पवृक्ष देखील म्हटले जाते. नारळात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचा वासत असतो.

3. श्रीफळ महादेवाला अतिप्रिय आहे. नारळात बनलेले तीन डोळ्यांना महादेवाच्या त्रिनेत्राच्या रूपात बघितले जाते.

4. श्रीफळ शुभ, समृद्धी, सन्मान, उन्नती आणि सौभाग्याचे सूचक आहे. त्यसाठीच आदरम्हणून शॉलसोबत श्रीफळ देण्यात येते. नारळपौर्णिमेला बहिणी आपल्या भावांना राखी बांधून नारळ भेट करते आणि रक्षेचे वचन घेते.

5. स्त्रियांसाठी नारळ फोडणे वर्जित आहे. त्या मागची मान्यता अशी आहे की नारळ बीज स्वरूप आहे, म्हणून याला उत्पादन (प्रजनन) क्षमतेशी जोडण्यात आले आहे. स्त्री प्रजननाची कारक आहे म्हणूनच स्त्रियांसाठी बीजस्वरूप नारळ फोडणे वर्जित मानण्यात आले आहे.

6. देवी देवतांना श्रीफळ अर्पित केल्यानंतर पुरुषच याला फोडतात. नारळातून निघालेल्या पाण्याने देवांच्या प्रतिमांचे अभिषेक केले जातात.

7. नारळाची प्रकृती गार असते. ताजे नारळ कॅलोरीने भरपूर असतात. यात अनेक पोषक तत्त्व असतात. जे आमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

8. जास्तकरून नारळाला फोडूनच देवी देवतांना वाहण्यात येते. या संबंधात अशी मान्यता आहे की आम्ही नारळ फोडून आपल्यातील वाईट गोष्टींचा आणि अहंकाराचा त्याग करतो.

9. मारुतीच्या प्रतिमेसमोर नारळ आपल्या डोक्यावरून 7 वेळा उतरवून फोडायला पाहिजे. यामुळे वाईट दृष्ट असल्यास त्याचा प्रभाव कमी होतो.

10. नारळ वरून कठोर आणि आतून एकदम नरम आणि गोड असत. आम्हाला आपल्या जीवनात देखील नारळाप्रमाणे बाहेरून कठोर आणि आतून नरम व मधुर स्वभावाचे असायला पाहिजे. नारळ आम्हाला हेच शिकवतो.