शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: गुरूवार, 9 एप्रिल 2020 (15:48 IST)

जप का करावा जाणून घ्या.....

हिंदू धर्मात जपाला विशेष महत्व आहे. जप केल्यास ते त्वरित फलदायी होतो. जप करताना आपल्या इष्ट देवाचे स्मरण करावे. अन्यथा कोट्यवधी जप करूनही  त्याचा कसलाही उपयोग होणार नाही. 
 
जप करीत असताना त्या-त्या दैवतांच्या तेजोवलयात आपण बसलो आहोत व ते दैवत आपल्याला शुभाशीर्वाद देत आहे, अशी भावना करून एकांतात देवापुढे बसून निश्चित मनाने जप करावा. 
 
हा जप माळेवर मोजून करावा, पण जप करताना आपले लक्ष्य इष्ट देवताऐवजी माळेकडेच जात असेल तर अर्ध्या तासात किंवा पंधरा मिनटात किती जप होतो हे एकदा पाहून घेऊन त्याप्रमाणे घड्याळ लावून जप करावा. 
 
जप करताना ताठ बसावे. ओठ न हलविता जप करावा. आजारी व वृद्ध व्यक्तींनी अंथरुणावर पडून जप केल्यास काहीही हरकत नाही. जपामुळे चित्तशुद्धी लवकर होते.