शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : रविवार, 22 मे 2022 (14:47 IST)

श्री नारायण हृदयं

Vishnu Mantra Stuti
उदयोन्मुख सूर्याच्या सारिखा, पतीवस्त्र जो। शंखचक्र-गदापाणी तो ध्यावा श्रीपती हरी।। नारायण परंज्योति, परमात्माही तोच तो। नारायण परब्रह्म, नमो नारायणा तुला ।।1।।
नारायण महान देव, महान् दाताहि तोच तो । नारायण महान् ध्याता, नमो नारायणा तुला ।।2।।
नारायण परंधाम, पर ध्याही तोच तो । नारायण महान् धर्म, नमो नारायणा तुला ।।3।।
नारायण महान् वैद्या, महाविद्यही तोच तो। नारायणचि विश्वात्मा, नमो नारयणा तुला ।।4।।
ब्रह्मा तुझ्यातुनी झाला, झाला शिव तुझ्यातुनी। तुझ्यातुनी इंद्र झाला, नमो नारायणा तुला ।।5।।
तेज तो दिव्य सूर्याचे, चंद्रतेजहि तोच तो। नारायण ज्वलनही, नमो नारयणा तुला ।।6।।
नारयणासि पूजावे, नारायण महान् गुरु। नारयणा ज्ञान थोर, नमो नारायण तुला ।।7।।
नारायण फलप्राप्ती, सुख, सिद्धी समस्त तो। पूजनीया शुद्धरुपा, नमो नारयणा तुला ।।8।।
।। इति मूलाष्टक ।।