सोमवार, 13 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 8 फेब्रुवारी 2021 (17:22 IST)

प्रदोष व्रत कथा, या दिवशी काय खावे आणि काय नाही जाणून घ्या

दर महिन्यात दोन प्रकाराच्या एकादशी असतात त्याच प्रकारे दोन प्रदोष देखील असतात. त्रयोदशी (तेरस) ला प्रदोष म्हणतात. हिन्दू धर्मात एकादशीला विष्णु तर प्रदोषला महादेवाशी संबंधित असल्याचे सांगितले गेले आहे. या दोन्ही व्रतांमुळे चंद्र दोष दूर होतं. 
 
प्रदोष व्रत कथा : 
प्रदोषला प्रदोष म्हणण्यामागे एक कथा जुळलेली आहे. संक्षेपात हे चंद्राचे क्षय आजार होते, ज्यामुळे त्यांना मृत्युतुल्य कष्ट होत होतं. भगवान शिवाने त्या दोषाचे निवारण करुन त्यांना त्रयोदशीच्या दिवशी पुन:जीवन प्रदान केले होते म्हणून हा दिवस प्रदोष म्हणून ओळखला जाऊ लागला. तसं तर प्रत्येक प्रदोष व्रत कथा वेगवेगळी आहे. स्कंद पुराणात प्रदोष व्रताचे महात्म्याचे वर्णन सापडतं. हे व्रत केल्याने सर्व प्रकाराच्या इच्छा पूर्ण होतात. यात एक विधवा ब्राह्मणी आणि शांडिल्य ऋषींची कथा द्वारे व्रत महिमा वर्णन सापडतं.
 
पद्म पुराणाच्या एक कथेनुसार चंद्रदेव जेव्हा आपल्या 27 बायकांपैकी केवळ एक रोहिणीशी सर्वात जास्त प्रेम करत होते तेव्हा इतर 26 ला उपेक्षित ठेवायचे ज्यामुळे त्यांना श्राप मिळाला आणि त्यांना कुष्ठरोग झाला होता. अशात इतर देवतांच्या सल्ल्यावर त्यांनी महादेवाची आराधना केली आणि जेथे उपासना केली तेथे शिवलिंग स्थापिले. महादेवांनी प्रसन्न होऊन त्यांना दर्शन दिले आणि आजारापासून मुक्त केले. चन्द्रदेवाचे एक नाव सोम देखील आहे. त्यांनी भगवान शिवाला आपलं नाथ-स्वामी मानले आणि तप केले म्हणून हे स्थान 'सोमनाथ' झाले. 
 
प्रदोष व्रत : काय खावे काय नाही
 
1. प्रदोष काळात उपासात केवळ हिरवे मूग खाल्ले पाहिजे. हिरवे भूग पृथ्‍वी तत्व आहे आणि मंदाग्निला शांत ठेवण्यास मदत करतं.
 
2. प्रदोष व्रतात लाल मिर्च, धान्य, तांदूळ आणि साधं मीठ खाणे टाळावे. आपण पूर्ण उपास किंवा फळाहार ही करु शकता.
 
प्रदोष व्रत विधी: व्रत असलेल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठावे. नित्यकर्म आटपून पांढर्‍या रंगाचे वस्त्र धारण करावे. पूजा स्वच्छ आणि शुद्ध ठेवावे. गायीच्या शेणाने मंडप तयार करावे. मंडपाखाली 5 वेगवेगळे रंग वापरुन रांगोळी काढावी. नंतर उतर-पूर्व दिशेकडे मुख करुन बसावे आणि महादेवाची पूजा करावी. पूर्ण दिवस धान्याचे सेवन करु नये.