बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शनिवार, 27 फेब्रुवारी 2021 (14:16 IST)

देव्हार्यात समई का लावतात

सम =म्हणजे सारखी. 
ई=म्हणजे आई. 
 
आई सारखी असणारी ती समई. आई जशी आपल्या मुलांनची चिंता करते, देवाजवळ आपल्या लेकरासाठी सुख आरोग्य मागत असते......
तशी देवघरात जळणारी समई रात्रंदिवस आपल्यासाठी शुभ चिंतन करत असते. 
 
देवाला आपण आई म्हणतो. विठाई माऊली असे संत तुकाराम महाराजांनी म्हंटले आहे. एवढे मातेचे महत्त्व आहे. कन्येला विवाहात रूखवातामध्ये प्रामुख्याने समई दिली जाते. आई थोर तुझे उपकार या भावनेने समईची पुजा केली जाते. (मुलगी कृतज्ञता व्यक्त करते).
 
निरांजन म्हणजे पंचमहाभूत तत्त्वांनी युक्त असा स्थूल देह!
 
निरांजनातील साजूक तूप म्हणजे देह!!
कापसाची वात म्हणजे कारण देह!!
 
ही वात पेटवल्यानंतर देव आणि भक्त यामध्ये प्रकाश पडतो. 
निरांजनातील ज्योत स्वतः जळून इतरांना प्रकाश देण्याचे कार्य करते. 
तसे आपल्या हातून परोपकार घडावेत, असा बोध यातून सुचित केला आहे.  
 
दीपज्योती नमोस्तुते 
 
-सोशल मीडिया