Dharma Sangrah

हिंदू शास्त्रानुसार शिव चतुर्दशी

Updated: गुरूवार, 8 जुलै 2021 (08:55 IST)
 
एका प्रहरानंतर एक गर्भिणी हरणी तलावावर पाणी पिण्यासाठी पोहचली. शिकार्यााने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधलाच होता तितक्यात ती हरिणी बोलली, मी गर्भिणी आहे, तू एकाच वेळी दोन जीवांची हत्या करशील. हे योग्य नाही. मी आपल्या पिलाला जन्म देऊन लवकरच तुझ्यासमोर येईल. तेव्हा तू मला मार.' शिकार्यामने धनुष्य बाजूला ठेवले आणि हरिणी झाडांआड लुप्त झाली.
 
काही वेळाने दुसरी हरिणी तेथून निघाली. शिकार्या'च्या आनंदाला पारावर उरला नाही. त्याने तिच्यावर नेम साधला. हे बघून त्या हरिणीने त्याला सांगितले, की 'हे पारधी! मी एक कामातूर विरहिणी आहे. आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे. मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्याजवळ येईल.'
शिकारीने तिलाही जाऊ दिले. दोनदा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित झाला. तेवढ्यात एक हरिणी आपल्या पिलासोबत तेथून निघाली. शिकार्यायला जणू सुवर्णसंधीच मिळाली. 
त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरिणी बोलली, हे पारधी! मी माझ्या पिलाला त्याच्या वडिलांकडे सोडून लगेच येते, यावेळी तू मला मारू नकोस.'
 
शिकारी हसला आणि म्हणाला समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही. याआधी मी दोनदा शिकार गमावली आहे. माझी मुले तहान-भुकेने व्याकूळ झाले असतील. उत्तरादाखल हरिणी म्हणाली, जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटते आहे तशीच मलाही वाटत आहे. त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवनदान मागत आहे. माझ्यावर विश्वास ठेव. मी लगेच परत येईल.
 
हरिणीचा तो व्याकूळ स्वर ऐकून शिकार्याेला तिची दया आली. त्याने तिलाही जाऊ दिले. शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता. काही वेळाने एक धष्ट-पुष्ट मृग त्या रस्त्यावरून जात होता. आता या मृगाची नक्कीच शिकार करावी असा विचार केला. पण त्याच्यावर नेम धरला असता मृग दीनवाण्या स्वरात म्हणाला, 'हे पारधी! जर तू माझ्या आधी तीन हरिणींना मारले असेल तर मला मारण्यातही वेळ करू नकोस, म्हणजे त्यांच्या वियोगात मला एकही क्षणाचे दु:ख सहन करावे लागणार नाही. मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवनदान दिले असशील तर मला काही क्षणांसाठी जीवनदान देण्याची कृपा कर. मी त्यांना भेटून तुझ्यासमोर हजर होईल.
 
मृगाचे बोलणे ऐकून शिकार्याच्या डोळ्यासमोरून संपूर्ण रात्रीचे घटना-चक्र आले. त्याने सर्व कथा मृगाला ऐकविली. तेव्हा मृगाने सांगितले, ' माझ्या तीनही पत्नी येथून वचनबध्द होऊन गेल्या आहेत, मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत. त्यामुळे तू मला आता जाऊ दे, मी त्यांच्यासमवेत तुझ्यासमोर हजर होतो.
उपवास, रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढविल्यामुळे शिकारीच्या हिंसक हृदयाचे निर्मल हृदयात परिवर्तन झाले होते. धनुष्य त्याच्या हातातून निसटले. शिवाने त्याच्या ह्रदयात बदल घडवून आणला. त्याला आपल्या भूतकाळातील कर्मांचा पश्चात्ताप झाला.
 
थोड्याच वेळात मृग सपरिवार शिकार्यासमोर आला. या प्राण्यांमधील प्रेम पाहून शिकार्याुच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. शिकार्याने त्यांना न मारता आपणही प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरविले.
 
देवलोकातून समस्त देव ही घटना बघत होते. घटनेची परिणती झाल्याबरोबर देवी-देवतांनी फुलांचा वर्षाव केला. तेव्हा शिवरात्री व्रत घडल्यामुळे शिकार्याला मोक्षाची प्राप्ती झाली. जेव्हा मृत्यु काळात यमदूत त्याचे प्राण नेण्यासाठी आले तेव्हा शिवगणांनी त्यांना वापस पाठवले आणि शिकार्या ला शिवलोकात घेऊन गेले.

सर्व पहा

Jyeshtha Gauri 2026 ज्येष्ठा गौरी आवाहन; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि या तीन दिवसांमागची कथा

मोदक पायसम खीर: पारंपरिक आणि चवदार दक्षिण भारतीय फ्युजन रेसिपी Modak Payasam Kheer

अनंत चतुर्दशी २०२६ कधी आहे? या दिवशी अनंत सूत्र बांधण्याची परंपरा आहे, या १४ गाठी कशाचे प्रतीक?

Santan Saptami 2026 १८ सप्टेंबर रोजी संतान सप्तमी, पूजा पद्धत, नियम आणि व्रताची कथा

दुकानातील मिठाई आणणे टाळा! घरीच बेसन वापरून १० मिनिटात मोतीचूर लाडू बनवा

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments