Varuthini ekadashi 2021: वरुथिनी एकादशी व्रत पूजा विधी, नियम आणि फळप्राप्ती

ekadashi
Last Modified सोमवार, 3 मे 2021 (13:51 IST)
एका महिन्यात 2 एकादशी असतात आणि वर्षात 365 दिवसात फक्त 24 एकादशी असतात. अधिकमासामुळे दर तिसर्‍या वर्षी एकूण 26 एकादशी असतात. प्रत्येक एकादशी व्रताचे नाव आणि फळ शास्त्रात दिले आहेत. आज आपण जाणून घ्या वरुथिनी एकादशीने व्रताचे महत्त्व, पूजा विधी आणि ‍नियम. ही एकादशी चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला येते.
वरुथिनी एकादशी व्रत मुहूर्त :
- 7 मे 2021 वार शुक्रवार
- वरुथिनी एकादशी पारणा मुहूर्त: 05:35:17 ते 08:16:17 पर्यंत 8 मे रोजी
- अवधि : 2 तास 41 मिनिटे
- एकादशी तिथी आरंभ - 06 मे 2021 दुपारी 02 वाजून 10 मिनिटापासून ते एकादशी तिथी समाप्त- 07 मे 2021 ला संध्याकाळी 03 वाजून 32 मिनिटापर्यंत
- द्वादशी तिथी समाप्त- 08 मे ला संध्याकाळी 05 वाजून 35 मिनिटावर
- एकादशी व्रत पारण वेळ- 08 मे सकाळी 05 वाजून 35 मिनिटापासून सकाळी 08 वाजून 16 मिनिटापर्यंत
पारणाच्या अवधी- 2 तास 41 मिनिटे

पूजन विधी :
1. दशमी तिथीला रात्री सात्विक भोजन करावं.
2. एकादशी व्रत दोन प्रकारे करता येतं. एक तर निर्जला किंवा फळाहार करुन.
3. एकादशी तिथीला सकाळी सूर्योदयापूर्वी उठून नित्य कार्य आटपून अंघोळ करावी. नंतर व्रत संकल्प घ्यावं.
4. त्यानंतर अक्षता, दीपक, नैवेद्य इत्यादी सोळा पदार्थांनी विधिवत भगवान विष्णूंची पूजा करावी.
5. मग घराजवळ एखादे पिंपळाचे झाड असल्यास त्याची पूजा करुन त्याच्या मुळामध्ये कच्चे दूध अर्पण करावं व तूपाचा दिवा लावावा.
6. शक्य नसेल तर तुळशी पूजन करावं. पूजा करताना ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्र जपत राहावं.
7. नंतर रात्री देखील भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची पूजा करावी.
8. दिवसभर विष्णूंचे स्मरण करत राहावे तसंच रात्री पूजा स्थळी जागरण करावे.
9. एकादशीच्या दुसर्‍या दिवशी द्वादशीला व्रत सोडावे. हे व्रत पारण मुहूर्तावर सोडावे. व्रत सोडल्यावर ब्राह्मण किंवा एखाद्या गरीब माणसाला अन्न द्यावे.
व्रताचे नियम :
कांस्यं मांसं मसूरान्नं चणकं कोद्रवांस्तथा।
शाकं मधु परान्नं च पुनर्भोजनमैथुने।।
- भविष्योत्तर पुराण

1. या दिवशी कांस्य भांड्यात अन्न खाऊ नये.
2. उपास करत नसला तरी मांस आणि मसूर खाऊ नये.
3. चणे किंवा कोदो भाज्यांचे सेवन करु नये. सोबतच मधाचे सेवन करणे निषिद्ध मानले जाते.
4. एकाच वेळी फळाहार करावा.
5. या दिवशी शारीरिक संबंध ठेवू नये.
6. या व्यतिरिक्त विडा खाणे, दात घासणे, मीठ-तेल किंवा अन्नाचे सेवन वर्जित मानले गेले आहे.
7. या दिवशी जुगार खेळणे, क्रोध करणे, खोटे बोलणे किंवा इतरांची निंदा करणे योग्य नाही. कुसंगती टाकून द्यावी.
व्रताचे फळ:
1. वरुथिनी एकादशी सौभाग्य प्रदान करणारी, पापांचा नायपाट करणारी आणि मोक्ष प्रदान करणारी आहे.
2. वरुथिनी एकादशीचे फळ दहा हजार वर्षांपर्यंत तप करण्यासमान आहे.
3. वरुथिनी एकादशी व्रत पालन करणे म्हणजे कुरुक्षेत्रात सूर्यग्रहण दरम्यान एक मन स्वर्णदान करण्यासमान आहे.
4. वरूथिनी एकादशी व्रत केल्याने मनुष्य या लोकात सुख भोगून परलोकात स्वर्गाला पोहचतो.
5. शास्त्रांमध्ये अन्नदान आणि कन्यादान हे सर्वात मोठे दान असल्याचे मानले गेले आहे. वरुथिनी एकादशीच्या व्रताने अन्नदान आणि कन्यादान या दोघांनाही समान फळ मिळते.
6. या व्रताचे महात्म्य वाचल्यास हजार गायींचा दान केल्याचे पुण्य लाभतं. याचे फळ गंगा स्नानापेक्षा अधिक असल्याचे समजले जाते.
7. या दिवशी खरबूज दान करावे.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

Vinayaka Chaturthi : 14 जून रोजी विनायक चतुर्थी, जाणून घ्या ...

Vinayaka Chaturthi : 14 जून रोजी विनायक चतुर्थी, जाणून घ्या पूजा विधी
विनायक चतुर्थी सोमवारी आहेत. चतुर्थी तिथी भगवान गणेशाची तिथी आहे. हिंदू धर्मग्रंथानुसार ...

Ganga Dussehra 2021: गंगा दसरा या तारखेला आहे, दान केल्याने ...

Ganga Dussehra 2021: गंगा दसरा या तारखेला आहे, दान केल्याने सौभाग्य प्राप्ती होईल
गंगा दशहराचा सण म्हणजे दानधर्मांचा सण. या दिवशी उन्हाळ्याशी संबंधित गोष्टी जसे शरबत, पाणी ...

दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी आणि चार श्वान ...

दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी आणि चार श्वान म्हणजे चार वेद
औदुंबराचा वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे; कारण त्यात दत्ततत्त्व जास्त प्रमाणात असते. ...

श्री अष्टलक्ष्मी स्तोत्रम

श्री अष्टलक्ष्मी स्तोत्रम
अथ श्री अष्टलक्ष्मी स्तोत्रम आदि लक्ष्मी सुमनस वन्दित सुन्दरि माधवि चंद्र सहोदरि ...

शनि जयंती 2021: शनिदेवला घाबरू नका, त्यांना समजून घ्या

शनि जयंती 2021: शनिदेवला घाबरू नका, त्यांना समजून घ्या
पौराणिक मान्यतेनुसार वैशाख महिन्याच्या अमावस्येला शनिदेवाचा जन्म झाला होता. यंदा शनि ...

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...