शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. होळी
Written By

काय आहे होलाष्टक, का असतात हे दिवस अशुभ?

होळी या तिथीची मोजणी होलाष्टकाच्या आधारावर होते. फाल्गुन शुक्ल पक्षाच्या अष्टमी पासून आठव्या दिवशी पर्यंत अर्थात होलिका दहन पर्यंत शुभ कार्य केले जात नाही. पौराणिक मान्यतेप्रमाणे होलाष्टकाच्या आठ दिवसात कोणतेही शुभ कार्य करणे योग्य नाही. या दरम्यान कामं केल्याने अपयश हाती लागण्याची शक्यता अधिक असते. 
 
काय आहे होलाष्टक?
होलाष्टक म्हणजे होळीचे पूर्ण आठ दिवस. धर्मशास्त्रात वर्णित 16 संस्कार जसे- गर्भाधान, विवाह, पुसवणं (गर्भाधारणाच्या तिसर्‍या महिन्यात करण्यात येणारे संस्कार), नामकरण, चूडाकरण, विद्यारंभ, गृह प्रवेश, गृह निर्माण, गृह शांती, हवन-यज्ञ कर्म इत्यादी करता येत नाही. या दिवसांत सुरू केलेल्या कार्यांमुळे कष्ट होतो, अडथळे निर्माण होतात. या दरम्यान विवाह संपन्न झाल्यास दांपत्याच्या जीवनात अस्थिरता बनलेली राहते. किंवा विवाह टिकत नाही. तसेच घरात नकारात्मकता, अशांती, दुःख आणि क्लेश असे वातावरण निर्मित होतं.
 
होलाष्टकाची परंपरा
ज्या दिवसापासून होलाष्टक प्रारंभ होतं त्या दिवशी गल्ली मोहल्यात चौरस्त्यावर जिथे कुठे परंपरा स्वरूप होलिका दहन केलं जातं तिथे गंगाजल शिंपडून प्रतीक स्वरूप दोन लाकडाच्या काठ्या प्रतीकस्वरुप स्थापित केल्या जातात. एक काठी होलिका आणि दुसरी काठी भक्त प्रह्लाद स्वरुप मानली जाते. यानंतर येथे लाकूड आणि कंडे लावले जातात. ज्यांना होळीच्या दिवशी जाळलं जातं, याला होलिका दहन असे म्हणतात.
 
का असतात हे दिवस अशुभ?
ज्योतिष शास्त्रानुसार होलाष्टकच्या प्रथम दिवशी अर्थात फाल्गुन शुक्लपक्ष अष्टमीला चंद्र, नवमीला सूर्य, दशमीला शनी, एकादशीला शुक्र, द्वादशीला गुरु, त्रयोदशीला बुध, चतुर्दशीला मंगळ आणि पौर्णिमेला राहुचा उग्र रूप असतो. या कारणामुळे या आठ दिवस मानव मस्तिष्क सर्व विकार, शंका आणि दुविधामुळे व्यापत असतं. यामुळे या दरम्यान सुरू केलेल्या कार्यांमध्ये यश मिळण्याऐवजी अपयश हाती लागतं. चैत्र कृष्ण प्रतिपदेला या आठ ग्रहांची नकारात्मक शक्ती कमजोर होत असल्याने लोकं आनंदाने अबीर-गुलाल, रंग उडवून सण साजरा करतात आणि याला होळी म्हणतात.