शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. होळी
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 मार्च 2021 (09:40 IST)

होळी विशेष होळी खेळण्यापूर्वी जाणून घ्या, रंगाचा मनावर काय प्रभाव पडतो

होळी हा रंगाचा सण आहे. रंगांशिवाय हा सण अपूर्ण आहे. रंगाचा वापर आनंदासाठीच करत नसून , मानसिक,शारीरिक आरोग्यासह रंगाचे अध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टीने देखील महत्त्व आहे.चला रंगांचे महत्त्व जाणून घेऊ या. 
 
 1 लाल रंग- लाल रंग हा ऊर्जा,उत्साह,महत्वाकांक्षा, राग,पराक्रमाचा आहे. प्रेम,आणि कामुकता चा प्रतीक देखील हा मानला गेला आहे.  
रक्त आणि हृदयाशी निगडित समस्या दूर करण्यासाठी  तसेच मानसिक खच्चीकरण, आत्मविश्वास ढासळणे सारखे त्रास देखील दूर होतात. तसेच धार्मिक दृष्टया लाल रंग देवीच्या पूजे साठी महत्त्वाचा मानला आहे. 

2 पांढरा रंग- हा रंग मानसिक शांतीचा, शुद्धतेचा रंग आहे. अशांत मनाला शांत करतो. विद्या प्राप्तीमध्ये सहायक आहे. जीवनात सकारात्मकता आणतो. मन आणि मेंदू शुद्ध करतो. अधिक तापट असणाऱ्या लोकांसाठी हा सकारात्मक रंग आहे. 
 
3 हिरवा रंग- हा शीतलता,ताजेपणा,गर्व, तणाव दूर करून आनंद देणारा नाडी रोग,लिव्हरचे रोग,आतड्यांचे रोग,दूर करून रक्ताच्या शुद्धीकरणासाठी फायदेशीर आहे. आत्मविश्वासात वृद्धी करतो. आनंदी  ठेवणारा रंग आहे. याला बुद्धीचा रंग देखील म्हणतात. हिरवा रंग सौभाग्य आणि समृद्धीचा रंग आहे. 

4 निळा- प्रेम,कोवळा,आपुलकी,जिव्हाळा,विश्वास,वीरता,पौरुषता दर्शविणारा असा हा निळा रंग आहे. हा रक्तदाब,श्वासाचे त्रास दूर करून डोळ्यांसाठी देखील फायदेशीर आहे. हा जल तत्वाचा रंग आहे. अध्यात्मिक विकास करतो. 
 
5 पिवळा- हा आरोग्य,शांती,शांतता,ऐश्वर्या आणि प्रसिद्धी चा रंग आहे. तर फिकट पिवळा रंग हा रोगांचा सूचक आहे. पित्त आणि पचन संबंधित त्रासांमध्ये हे फायदेशीर आहे. हा तारुण्याचा प्रतीक आहे. बौद्धिक विकास देखील दर्शवतो. आनंद देणारा हा रंग स्पष्टवादिताचा प्रतीक देखील आहे.