1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. होळी
Written By
Last Modified गुरूवार, 5 मार्च 2020 (16:19 IST)

होळी निमित्त खमंग पुरणपोळी.......

साहित्य 
1 वाटी हरभरा(चणा) डाळ, अडीच वाटी साखर, लहान गुळाचा खडा, वेलची पूड, जायफळ पूड, 2 वाटी गव्हाचे पीठ, अर्धा वाटी मैदा (चाळणीने चाळलेला), मोयन (तेलाचे), साजूक तूप,
 
पुरण करण्यासाठीची कृती 
सर्वप्रथम चणाडाळ स्वच्छ धुवून कुकर मध्ये शिजवून घ्यावे. शिजल्यावर डाळीतले पाणी काढून त्यास कोंबट करावी. त्यामध्ये साखर घालून मिक्सरच्या पात्रात मिक्स करून एकजीव करावी. कढईत 2 चमचे साजूक तूप घालावे. असे केल्याने पुरण कढईत चिटकत नाही. मिक्सर मधली वाटलेली डाळ कढईत टाकावी त्यात गुळाचा खडा टाकावा. याने पोळी खमंग होते. एकसारखं हालवत राहावे. कढईत कडेने पुरण सुटल्यावर थोडंसं ताटलीवर टाकून बघायचे की घट्ट गोळा बनत आहे की नाही. त्या पुरणात वेलची पूड, जायफळाची पूड घालावी. पुरण गार होण्यासाठी ठेवावे.
 
गव्हाच्या पीठात मैदा घालावा त्यात थोडे मीठ घालावे. तेलाचे मोहन भरपूर घालावे. जेणेकरून पीठ भुसभुशीत राहायला नको. कणिक मळून 1/2 तास मुरण्यासाठी ठेवावी.
पीठी लावण्यासाठी मैदा आणि तांदळाचे पीठ घ्यावे. आता कणीक एकसारखी करून त्याच्या लहान लहान गोळ्या करून पारी करावी त्यात पुरण भरून लाटून घ्यावी. बारीक तव्यावर शेकून घ्यावी. साजूक तूप घालून दोन्ही कडून शेकावी. खमंग पुरण पोळीवर साजूक तूप घालून सर्व्ह करावी.