रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. ग्लासातल्या ग्लासात
Written By
Last Updated : रविवार, 31 मार्च 2024 (17:53 IST)

Holi Special Recipe: अननस लस्सी रेसिपी, जाणून घ्या फायदे

Pineapple Drinks Recipes :  अननस लस्सी मध्ये विटामिन C भरपूर प्रमाणात असते. तसेच अननस लस्सी पाचनसाठी फायदेशीर असते. दही शरीराला थंड ठेवते आणि स्ट्रेस पासून आराम देते. 
 
साहित्य 
1 कप ताजे अननस(कापलेले)
1 कप दही
2 चमचे मध 
1/2 चमचा मीठ 
1/2 चमचा मीरे पूड 
बर्फ 
 
कृती 
मिक्सर ब्लेंडर मध्ये अननस आणि दही टाका. मग यामध्ये मध, मीठ, मीरे पूड टाका. आता हे सर्व मिश्रण फिरवून घ्या. हे एक मऊ मिश्रण तयार होईल. आता हे एक ग्लास मध्ये काढून त्यात बर्फ टाकावा. ही रेसिपी तुम्ही होळीला तसचे पार्टी किंवा इतर दिवशी ट्राय करू शकतात.    
 
अननस लस्सीचे फायदे 
1. विटामिन C: अननस एक उत्कृष्ट विटामिन C चा स्रोत आहे. जे, आपल्या शरीरासाठी महत्वपूर्ण आहे. हे आपल्या रोगप्रतिकात्मक शक्तीला वाढवते.  
 
2. अल्कालाइन स्वभाव: पाइनएप्पल एक अल्कालाइन फळ आहे. जे आपल्या शरीरातील अम्लीयता स्तर टिकवून ठेवण्याकरिता मदत करते. यामुळे आपल्या शरीरातील संतुलितता टिकून राहते आणि चांगले आरोग्य प्राप्त होते.  
  
3. पाचनसाठी मदतगार : अननस अनेक प्रकारच्या एंजाइम्सचा स्रोत आहे, जो पाचनसाठी मदतगार आहे. यामुळे आपले पाचनतंत्र सुरळीत राहते. 
 
4. आरोग्यदायी ह्रदय : अननसमध्ये असलेले फाइबर आणि विटामिन C तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामुळे हृदय संबंधीत समस्यांचा धोका कमी होतो. 
 
5. वजन नियंत्रण: अननसच्या सेवनाने आपले वजन नियंत्रणात राहते. कारण हे कमी कॅलरी आणि जास्त फाइबरने परिपूर्ण असते. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्यमाहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता,विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik