बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. ग्लासातल्या ग्लासात
Written By

रंगपंचमी करीता ठंडाईचा मसाला कसा बनवावा जाणून घ्या रेसिपी

रंगपंचमीला अनेक पदार्थ बनवले जातात. या सणाला करंजी, स्नॅक्स सोबत ठंडाई बनवली जाते. ठंडाईचा मसाला हा एक असा मसाला आहे, जो होळीला बनणाऱ्या ठंडाईमध्ये वापरला जातो. बाजारात देखील ठंडाई मसाला उपलब्ध आहे. पण तुम्ही याला घरी देखील बनवू शकतात. ठंडाईचा मसाला बनवण्यासाठी सुगंधित मसाले आणि ड्राय फ्रूट्सला मिक्स केले जाते. तर चला लिहून घ्या ठंडाई मसाला रेसिपी 
 
साहित्य-  
हिरवी वेलची 
मीरे पूड 
दालचीनी 
बादाम 
काजू 
पिस्ता 
खरबूजच्या बिया 
खसखस 
केशर 
गुलाबाच्या पाकळ्या 
 
कृती- 
एका पॅन मध्ये सर्व मसाले छान सुंगंध येईपर्यंत हल्केसे भाजून घ्या. मग नंतर हे सर्व मसाले थंड होऊ दया. बादाम, काजू, पिस्ता, खरबूजच्या बिया आणि खसखसला वेगवेगळे हल्केसे भाजून घ्या व नंतर थंड करायला ठेवा. मग ह्या सर्व वस्तु मिक्सर मधून बारीक करून घ्या. मग बारीक केलेल्या या मिश्रणात केशर टाका व परत हे सर्व मिश्रण छान मिक्स करा. या तयार झालेल्या मिश्रणला एका हवा बंद डब्ब्यात ठेऊन कोरडया जागेवर ठेवावे.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik