पुरण सैल झाले तर काय करावे
चण्याची डाळ जास्त वेळा चोळून धुवू नये.
डाळ शिजवण्यापूर्वी दोन तास भिजत ठेवावी.
कुकरमधून डाळ शिजवताना स्टीलचं भांड वापरा. सरळ कुकरमध्ये पुरण शिजवल्यास काळपट होण्याची शक्यता असते.
डाळ शिजवताना त्यात चमचाभर तुप घालावं. पुरण लवकर शिजतं आणि चिकटत नाही.
आपल्या आवडीप्रमाणे डाळ शिजताना त्यात जराशी हळद घालू शकता याने रंग छान येतो.
डाळीत गूळाबरोबर थोडीशी साखर घातली तर पुरण लवकर शिजतं, चव देखील चांगली येते तसंच पोळी लाटायलाही सोपी जाते.
डाळीचा कट जास्त पाणी घालून काढू नये याने पुरणाचा स्वाद कमी होतो.
पुरण शिजवताना त्यात उलथने उभे राहिले की पुरण तयार असल्याचे समजावे.
पुरण शिजवताना पातेल्यात कड वाळलेली दिसू लागती तसंच खमंग वास सुटला की पुरण तयार झाले समजावे.
पुरण शिजवताना त्यात वेलदोडा किंवा जायफळपूड न मिसळता पुरण तयार झाल्यावर हे मिसळण्याने चांगली चव येते.
पुरणात किंचित मिरे घातल्याने पुरणाच्या पोळ्या बाधत नाहीत.
पुरण सैल झाले असल्यास पोळी तयार करणे अवघड होतं अशात पुरण थोडे गरम करून घट्ट करुन घ्यावे नंतर गार झाल्यावर पोळी छान होते.
सैल पुरण नॉनस्टीक कढईत घालून मंद आचेवर परतल्याने घट्ट होतं.
पुरण सैल झाल्यास त्या चिमूटभर सोडा घातल्यानेही पुरण घट्ट होतं.
पुरण सैल वाटत असल्यास पुराणाला मलमलच्या कपड्यावर पसरुन घ्यावं. याने अतिरिक्त पाणी शोषलं जातं आणि पुरण घट्ट होण्यास मदत होते.