रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड
Written By वेबदुनिया|

अँजेलिना जोलीचा अभिनय क्षेत्राला बायबाय!

WD
आपल्या अदांनी जगभरातल्या सिनेरसिकांना भुरळ घालणारी हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली हिने सिनेमा क्षेत्रातून निवृत्ती घेण्याचे ठ‍रविले आहे. यापुढे तिला आपल्या मुलांसाठी जास्त वेळ द्यायचा असल्याने तिने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. 'द सन' वृत्तपत्रात दिलेल्या वृत्तानुसार, माझ्या मोठ्या होणार्‍या मुलांचा सांभाळ आणि त्यांना भरपूर वेळ देणे हे माझे पहिले काम आहे. त्यामुळे मला सिनेमात अभिनय करण्यापेक्षा जास्त करून त्यांना महत्त्व दिले पाहिजे. यासाठी मी यापुढे सिनेमात अभिनय करणार नाही, असे अँजेलिना जोली ने म्हटले आहे. फोर्ब्ज या नियतकालिकाने प्रसिद्ध केलेल्या यादीत जगातील शंभर श्रीमंत सेलिब्रिटींमध्ये पहिल्या क्रमांकावर 37 वर्षीय अँजोलिना जोलीचे नाव आहे, तसेच तीन वेळा गोल्डन ग्लोब, दोन वेळा स्क्रीन अ‍ॅक्टर्स गिल्ड पुरस्कार अँजोलिना जोलीला मिळाले आहेत. अँजोलिना जोलीने 1982मध्ये सात वर्षांची असताना 'लूकिंग टू गेट आउट'या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर आतापर्यंत अनेक सिनेमात तिने काम केले आहे.