अँजेलिना जोली व ब्रॅड पिट अखेर अडकले लग्नाच्या बेडीत!
हॉलिवूडमधील बहुचर्चित जोडी अभिनेत्री अँजलिना जोली व अभिनेता ब्रॅड पिट अखेर लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. अँजलिया आरि ब्रॅड मागील नऊ वर्षांपासून एकत्र राहात होते. त्यानंतर दोघांनी विवाहाचा निर्णय घेतला. दोघेही शुक्रवारी फ्रान्समध्ये विवाहबद्ध झाले. विशेष म्हणजे या सोहळ्यास त्यांची सहा मुलेही उपस्थित होती.
'मि.अँड मिसेस.स्मिथ'सिनेमाच्या माध्यमातून पिट व जोली या दोघांची ओळख झाली व त्याचे प्रेमात रुपांतर झाले. ब्रॅड पिटचे हे दुसरे लग्न असून यापूर्वी त्याने 2000 साली अभिनेत्री जेनिफर अॅखनिस्टशनी लग्न केले होते, मात्र 2005 साली ते विभक्त झाले. तर अँजलिना जोलीचे हे तिसरे लग्न आहे.
दोघांनी प्रथम कॅलिफोर्निया येथून जजकडन लग्नाचे प्रमाणपत्र घेतले व त्यानंतर फ्रान्समधील शानदार विवाहसोहळ्यात ते लग्नगाठीत अडकले.