शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. हॉलीवूड
Written By wd|
Last Modified: लॉस एंजलिस , मंगळवार, 12 ऑगस्ट 2014 (11:16 IST)

अभिनेते रॉबिन विल्यम्स (ऑस्कर विजेते) यांचे निधन

ऑस्कर विजेते अभिनेते रॉबिन विल्यम्स हे उत्तर कॅलिफोर्नियातील टिबूरॉन येथील निवासस्थानी बेशुद्धावस्थेत असल्याचा फोन अमेरिकेतील आपतकालीन यंत्रणेला आला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता रॉबिन यांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. रॉबिन यांना दारुचे व्यसन होते.

तसेच गेल्या काही दिवसांपासून ते मानसिक तणावात होते अशी माहिती त्यांच्या प्रसिद्धी प्रमुखाने दिली. विल्यम्स यांनी आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. ते ६३ वर्षांचे होते. गुड विल हंटींग, नाईट अ‍ॅट म्यूझियम - दि सिक्रेट ऑफ टॉम्ब, जूमांजी, डेड पोएट सोसायटी या चित्रपटांमधील अभिनयातून त्यांनी प्रेक्षकांवर छाप पाडली होती.