सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड
Written By वेबदुनिया|

डेनियल क्रॅग सर्वात चांगला जेम्स बाँड

WD
डेनियल क्रॅगने स्कायफॉल चित्रपटात दमदार अभिनय करून पुन्हा एखदा चाहत्यांना प्रभावित केले आहे. आता पर्यंत सहा लोकांनी जेम्स बाँडची भूमिका साकारली आहे. मात्र सर्वात चांगला हाच जेम्स बाँड असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. 1987-1989 पर्यंत जेम्स बाँड साकारणार्‍या टिमोथी डॉल्टन म्हणतात की, डेनियल आतापर्यंतचा सर्वात बेस्ट 007 एजेंट आहे. 66 वर्षांच्या टिमोथीचे म्हणणे आहे की, डेनियलने आतापर्यंतच्या सर्वच कलाकारांना मागे टाकले आहे. खरं तर टिमोथी यांनी अजून स्कायफॉल पाहिलेला नाही. मात्र 'कॅसिनो रोयाल' आणि 'क्वांटम ऑफ सोलेस' पाहूनच ते डेनियलचे चाहते झाले आहेत.