रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड
Written By वेबदुनिया|

पॅरिस हिल्टनचा नवा बॉयफ्रेंड

WD
अमेरिकेची फॅशन डिझायनर पॅरिस हिल्टन सध्या 21 वर्षीय स्पॅनिश मॉडल विपैरीसोबत डेटिंग करीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिल्टना हा बॉयफ्रेंड वयाने तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. या दोघांची भेट न्यूयॉर्कमध्ये एका फॅशन शोमध्ये झाली होती. एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार जेव्हापासून फॅशन शोमध्ये त्यांची भेट झाली आहे, तेव्हापासून या दोघांमधील जवळीकता वाढली आहे. विशेष म्हणजे 31 वर्षीय हिल्टन जुलैमध्ये आपल्या एक्स बॉयफ्रेंड साय वेटपासून विभक्त झाली आहे. हिल्टनला याबाबतीत विचारले असता तिने सांगितले, प्रत्येक स्त्रीचे एक स्वप्न असते, ती तिचे लग्न व्हावे आणि तिचा एक सुंदर परिवार असावा, परंतु मी सध्या कामात खूप व्यस्त आहे. त्यामुळे मला या गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही.