रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड
Written By वेबदुनिया|

मायकल जॅक्सनच्या मुलाचा खरा पिता कोण?

PR
दिवंगत पॉपस्टार मायकल जॅक्सनचा मुलगा प्रिंस याचा खरा पिता कोण, यावरून आता वाद सुरू झाला आहे. प्रिंसचा जैविक पिता असल्याचा दावा एका डॉक्टरने केला आहे. दावा करणारा हा डॉक्टर मायकल जॅक्सनचा डर्मेटॉलॉजिस्ट राहिलेनला एनीं क्लीन आहे. त्याने फेसबुकवर एका पोस्टमध्ये इशार्‍यात स्वत: प्रिंसचा खरा पिता असल्याचे दावा केला आहे.

मायकल जॅक्सन यांनी वारंवार हेच सांगितले होते, की तिन्ही मुलांचे जैविक पिता तोच आहे. त्यापैकी दोघांना त्यांची पूर्व पत्नी डेबी रोव्हने जन्म दिला आहे. परंतु डॉ. क्लीनच्या दाव्याने वेगळाच वाद निर्माण होऊ शकतो.

गेल्या काही काळापासून डॉ. क्लीन दिवाळखोरीच्या संकटाता सामाना करीत आहे. फेसबुकवर त्याने प्रिसंच्या एका छायाचित्राची स्वत:शी तुलना करून एक फोटे ओळ टाकली आहे. त्यात त्याने स्वत:ला प्रिंसचा पिता असल्याचा दावा केला आहे. त्याने 15 वर्षीय प्रिंसच्या छायाचित्रासोबत स्वत:चे एक जुने छायाचित्र जोडून दोघांमधील साम्य दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. हे छायाचित्र पाहिल्यानंतर जुन्या चर्चेला उत आले आहे. क्लीन याने मायकल जॅक्सनला पितर बनण्यासाठी स्वत:चे स्पर्म दान केले होते, अशी चर्चा एकेकाळी रंगली होती. जॅक्सनची पूर्व पत्नी डेबी रोब ही एकेकाळी डॉ. क्लीनची सहायक होती. तिच्यपासून मायकल जॅक्सनला मुगला प्रिंस आणि मुलगी पॅरिस ही दोन अपत्ये आहेत. मायकल जॅक्सनचे 2009 मध्ये निधन झाले, परंतु डेबीने आतापर्यंत प्रिंसच्या खर्‍या पित्याबाबत काहीही वक्तव्य केलेले नाही.