रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड
Written By वेबदुनिया|

मृत्यूच्या ऑनलाइन अफवेचे फुटले पेव

WD
विख्यात हॉलिवूड अभिनेता जॅकी चॅन मृत्यूच्या ऑनलाइन अफवेचे पुन्हा एकदा पेव फुटले आहे. एका सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान थरारक स्टंट करताना 59 वर्षीय जॅकी चॅनचा मृत्यू झाल्याची बातमी एका वेबसाईटने प्रकाशित केल्यानंतर फेसबुक आणि टिटर या सोशल नेटवर्किग साईटवर चाहत्यांनी त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी सुरुवात केली आहे. मात्र जॅकी चॅनचा मृत्यू झाला नसून तो ठणठणीत आहे.

तसे पाहता जॅकी चॅनच्या मृत्यूची अफवा पहिल्यांदाच उठली नाहीये. यापूर्वी 21 जूनलासुद्धा जॅकीच्या निधनाची अशीच अफवा सोशल नेटवर्किग साईट्सच्या माध्यमातून पसरली होती. तेव्हा जॅकी चॅनने स्वत:चे एक छायाचित्र प्रकाशित करुन मी जिवंत असल्याचे त्याच्या चाहत्यांना सांगितले होते.