सुप्रसिद्ध अभिनेता जॅकी चेनच्या मुलाला चीनमध्ये अटक
सुप्रसिद्ध अभिनेता जॅकी चेनचा 32 वर्षीय मुलगा आणि अभिनेता जेसी चेन याला पेइचिंग येथे अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर अमली पदार्थ बाळगल्याचा आरोप आहे. जेसी चेनसोबत त्याच्या एका तैवानी मित्रासोबत पोलिसांनी अटक केली आहे.
जेसी हा फांग जुमिंगच्या नावाने ओळखला जातो. जेसी चॅन आणि त्याचा 23 वर्षीय मित्र 'चेन-तुंग' तैवानचा अभिनेता आहे. ह्या दोघांनाही ताब्यात घेण्यात आल्याचे चीनच्या माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्ता म्हटले आहे.
दोघांनाही केव्हा अटक केली हे अजून समजू शकले नाही. हे दोघे ही चीनमधील सोशल मीडिया साइट 'वाइबो' वर खूपच लोकप्रिय आहेत.