शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. हॉलीवूड
Written By wd|
Last Updated :मुंबई , मंगळवार, 26 ऑगस्ट 2014 (10:37 IST)

सुप्रसिद्ध दिग्दर्शक सर रिचर्ड अॅटेनबरो यांचे निधन

ऑस्कर विजेत्या 'गांधी' सिनेमाचे प्रख्यात निर्माते, दिग्दर्शक सर रिचर्ड अॅटेनबरो यांचे सोमवारी  निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. अनेक महिन्यांपासून ते आजारी होते. अखेर वाढदिवसाच्या चार दिवस आधीच सर रिचर्ड यांची प्राणज्योत मालवली.
  
मूळचे ब्रिटिश असलेले अॅटेनबरो यांनी महात्मा गांधींजींचे आयुष्य पडद्यावर आणण्यासाठी २० वर्षे संघर्ष केला होता.  1923 मध्ये जन्मलेल्या  अॅटेनबरो यांनी ‘ओ व्हॅट अ लव्हली वॉर’सह अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन व निर्मिती केली होते. स्टीव्हन स्पीलबर्ग यांच्या ‘ज्युरासिक पार्क’, ‘द ग्रेट एस्केप’ मधील त्यांच्या भूमिका गाजल्या. ‘ब्रायटन रॉक’मधील  त्यांची ‘पिंकी ब्राऊन’ही भूमिका खूप गाजली होती.