शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 9 नोव्हेंबर 2024 (18:31 IST)

रेल्वे स्थानकावर मोठा बॉम्बस्फोट, 24 जण मृत्युमुखी

pakistan bomb blast
पाकिस्तानच्या अशांत प्रांत बलुचिस्तानमध्ये भीषण बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 15 जवानांचाही समावेश आहे. तर 46 हून अधिक जण जखमी झाले आहेत. बलुचिस्तानमधील क्वेट्टा येथील रेल्वे स्थानकाजवळ हा बॉम्बस्फोट झाला.

स्फोटाच्या वेळी स्थानकावरील गर्दी सामान्य होती. असे असूनही अधिक जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवण्याता आली आहे. स्फोटाची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव कर्मचारी स्फोटाच्या ठिकाणी पोहोचले. क्वेटा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली होती आणि जखमींवर उपचार करण्यासाठी अतिरिक्त डॉक्टर आणि पॅरामेडिक्सला पाचारण करण्यात आले होते. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जाफर एक्स्प्रेस सकाळी 9 वाजता पेशावरसाठी रवाना होणार होती. स्फोट झाला तेव्हा ट्रेन प्लॅटफॉर्मवर पोहोचली नव्हती असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने स्फोटातील मृतांचा आकडा वाढू शकतो.
 
कार्यवाहक राष्ट्रपती सय्यद युसूफ रझा गिलानी यांनी या प्राणघातक घटनेचा निषेध करत म्हटले की, दहशतवादी हे मानवतेचे शत्रू आहेत जे निष्पाप लोकांना लक्ष्य करतात. दहशतवादाचा समूळ नायनाट करण्यासाठी शक्य ते सर्व पाऊल उचलण्याच्या आपल्या संकल्पाचा गिलानी यांनी पुनरुच्चार केला.
बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या जीवघेण्या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले. 
Edited By - Priya Dixit