शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 21 ऑक्टोबर 2020 (12:31 IST)

PAKच्या कराचीमध्ये एका इमारतीत मोठा स्फोट, 3 ठार आणि 15 जखमी

कराची पाकिस्तानच्या कराची शहरातील इमारतीत बुधवारी सकाळी झालेल्या भीषण स्फोटात कमीतकमी 3 जणांचा मृत्यू आणि 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. कराचीच्या गुलशन-ए-इकबाल भागात झालेल्या या स्फोटाचे कारण स्पष्ट झाले नाही परंतु स्फोट इतका जोरदार होता की इमारतीचा एक भाग पूर्णपणे कोसळला आहे. जखमींना जवळच्या पटेल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
डॉनच्या अहवालानुसार हा स्फोट इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर झाला. या भीषण स्फोटामुळे आजूबाजूच्या इमारतींचे काचही तुटले आहेत, असे प्रत्यक्षदारशींचे म्हणणे आहे. अद्याप स्फोटाचे कारण समजू शकले नाही. स्थानिक पोलिसांचे म्हणणे आहे की सिलिंडर फुटला असल्याचे दिसते. मात्र, बॉम्बं विल्हेवाट लावण्याचे पथकही घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे.
 
संपूर्ण परिसर घेरला गेला आहे आणि सिंधचे मुख्यमंत्री मुराद अली यांनी कराचीच्या आयुक्तांकडे अहवाल मागविला आहे. सर्व जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यापूर्वी जिन्नाद कॉलनीत झालेल्या स्फोटात 5 जण जखमी झाले होते. तो आयईडीचा स्फोट असल्याचे पोलिसांनी सांगितले.