शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 21 मे 2017 (20:36 IST)

सौदीने दिले वादग्रस्त धर्मगुरू झाकीर नाईकला नागरिकत्व

वादग्रस्त धर्मगुरू झाकीर नाईकने इंटरपोलपासून बचावासाठी सौदी अरेबियाच्या नागरिकत्वाचा आग्रह धरला होता. सौदीने नाईकचा अर्ज मंजूर केला आहे. आता त्याला नागरिकत्व देण्यात आले आहे. ढाका येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील हल्लेखोरांनी आपल्याला झाकीर नाईकपासून प्रेरणा मिळाल्याचे म्हटले होते. त्यामुळे आपल्याला अटक होऊ नये, म्हणून नाईक भारत सोडून गेला होता. नाईकची स्वंयसेवी संस्था इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर (आयआरएफ) सरकारने बंदी घातली आहे. काही दिवसांपूर्वी न्यायालयानेही नाईकच्या संस्थेवर बंदीचा निर्णय कायम ठेवला होता. भारताच्या सुरक्षेला धोका असल्यामुळे आयआरएफवर बंदी घालण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले होते.