suvichar
✕

कोरोना : अमेरिकेवर सर्वात मोठा सायबर हल्ला, आणीबाणी लागू

Updated: सोमवार, 10 मे 2021 (15:29 IST)
 
जाणकारांच्या मते, याच घटनेमुळे सोमवारी (10 मे) इंधनाचे दर 2-3 टक्क्यांनी वाढतील. तसंच, जर हे प्रकरण लवकरात लवकर निस्तरलं गेलं नाही, तर याचा परिणाम आणखी व्यापक होण्याची शक्यता आहे.
 
काही सूत्रांनी या अंदाजाला दुजोरा दिलाय की, हा रॅन्समवेअर हल्ला डार्कसाईड नावाच्या एका सायबर गुन्हेगारी गटानं केलाय. त्यांनी गुरुवारी (7 मे) कोलोनियल नेटवर्कमध्ये घुसखोरी केली आणि जवळपास 100 जीबी डेटा ताब्यात घेतला.
 
यानंतर हॅकर्सनी काही कॉम्प्युटर आणि सर्व्हरवरही डेटा लॉक केला. त्यानंतर शुक्रवारी (8 मे) खंडणीची मागणी केली. खंडणी मागताना धमकी दिली गेली की, पैसे न दिल्यास हा डेटा इंटरनेटवर लीक करण्यात येईल.
अमेरिकेतील या सरकारी इंधन कंपनीनं रविवारी (9 मे) रात्री सांगिलं की, इंधन पुरवठा सेवा पूर्ववत करण्यासाठी पोलीस, सायबर सुरक्षातज्ज्ञ आणि ऊर्जा विभागाशी संपर्कात आहोत.
 
या कंपनीच्या चार मुख्य पाईपलाईन ठप्प असून, टर्मिनवरून डिलिव्हरी पॉईंटपर्यंत इंधन घेऊन जाणाऱ्या छोट्या छोट्या पाईपलाईन व्यवस्थित काम करत आहेत.
 
कंपनीचं म्हणणं आहे की, "सायबर हल्ल्याची माहिती मिळताच, सिस्टमपासून काही लाईन वेगळ्या केल्या. जेणेकरून त्यांच्यावरही हल्ला होऊ नये. यामुळे आमच्या सर्व पाईपलाईन आणि काही आयटी सिस्टमचं काम काही वेळासाठी थांबलं. आता ते नीट करण्याचं काम सुरू आहे."
 
तेल बाजाराचे विश्लेषक गौरव शर्मा यांनी बीबीसीला सांगितलं की, आताच्या घडीला बरंचसं इंधन टेक्सास राज्यातील रिफायनरीत अडकून पडलंय.
 
ते पुढे म्हणतात, "आणीबाणी लागू करून तेल, गॅस यांसारख्या इंधनांच्या टॅंकर्सना न्यूयॉर्कपर्यंत पाठवलं जाऊ शकतं. मात्र, पाईपलाईनच्या तुलनेत हा पुरवठा अत्यंत कमीच असेल. 11 मे पर्यंत जर हे दुरुस्त केलं गेलं नाही, तर मोठ्या अडचणीत अडकतील."
"सर्वात आधी अटलांटा आणि टेनेसीवर परिणाम होईल. त्यानंतर हा परिणाम वाढत जात न्यूयॉर्कपर्यंत पोहोचेल," असं गौरव शर्मा म्हणतात.
 
"अमेरिकेत इंधनाची वाढ वाढतेय. कारण अमेरिकेत कोरोनाच्या साथीतून पुन्हा उभं राहण्यासाठी लोक बाहेर पडू लागलेत आणि तेल कंपन्या वाढत्या मागणीला पूर्ण करण्यासाठी संघर्ष करताना दिसतेय," असं शर्मा सांगता.
 
हल्ला कसा झाला?
लंडनस्थित सायबर सिक्युरिटी कंपनी डिजिटल शॅडोजच्या मते, कोलोनियन पाईपलाईनवर हल्ल्याचं सर्वात मोठं कारण कोरोनाची साथ असू शकते. कारण कंपनीचे बरेचसे इंजिनियर घरातून कॉम्प्युटरवर काम करत होते.
 
डिजिटल शॅडोजचे सहसंस्थापक आणि चीफ इनोव्हेशन ऑफिसर जेम्स चॅपल यांच्या मते, डार्कसाईडने टीम व्ह्यूवर आणि मायक्रोसॉफ्ट रिमोट डेस्कटॉप यांसारख्या रिमोट सॉफ्टवेअरशी संबंधित अकाऊंटचे लॉगइन डिटेल खरेदी केले. कुणीही व्यक्ती शोडानसारख्या सर्च इंजिनवर इंटरनेटशी संबंधित कॉम्प्युटरचे लॉगइन पोर्टल्सची माहिती मिळवू शकते. त्यानंतर हॅकर्स युजरनेम आणि पासवर्डच्या माध्यमातून अकाऊंटमध्ये लॉगइन करण्याचा प्रयत्न करतात.
 
चॅपल म्हणतात की, अनेक लोक आता याचा शिकार होतायेत. ही एक मोठी समस्या बनतेय. दररोज नवीन शिकार बनवतोय. लहान व्यवसाय याचं शिकार बनत असल्यानं जागतिक अर्थव्यवस्थेसाठी मोठी डोकेदुखी बनत चाललीय.
 
"सायबर गुन्हेगारांचा हा गट कुठल्यातरी रशियन भाषिक देशात आहे. कारण हा गट रशिया आणि आजूबाजूच्या देशांमधील कंपन्यांवर हल्ले करत नाही," असं चॅपल यांच्या कंपनीचं संशोधन सांगतं.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख
Show comments