बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: रविवार, 9 मे 2021 (17:06 IST)

कोरोना कालावधीत इतर आरोग्याच्या समस्या उद्भवत आहे जाणून घ्या

कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात वाढत आहे. या पूर्वी इतकी भयावह आपत्ती कोणीही बघितली नसेल. या साथीच्या आजारापासून मुक्त होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. सर्व प्रकारच्या खबरदारी घेऊन लोक घराबाहेर पडत आहेत. कोरोनाने लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. कोरोना कालावधीत एखाद्याला सर्दी आणि खोकला आला तरी फक्त कोरोनाचे नाव मनात येते. कोरोनाव्हायरसचा सामना करताना लोकांना इतर आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागतो.
चला कोणते ते त्रास उद्भवत आहे जाणून घेऊ या.
 
1 मानसिक आरोग्यावर परिणाम- कोरोनाव्हायरस लोकांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम करीत आहेत. सकाळी आणि संध्याकाळी कोरोनाशी संबंधित बातम्या वाचून आणि वाचल्यानंतर लोकांना मानसिक त्रास होऊ लागला आहे. यामुळे ते पॅनीक देखील होत आहे. 
 
2 निद्रानाश -कोरोना कालावधीत, सतत चिंता आणि बदलत्या दिनचर्यामुळे लोकांना निद्रानाश यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत त्याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर दिसून येतो.
 
3 औदासिन्य- कोरोना कालावधीत नकारात्मकता लोकांवर वर्चस्व करत आहे.  ते भविष्य आणि नोकरीबद्दल सतत चिंता करत असतात आणि यामुळे तरुणांना नैराश्याच्या दिशेने नेत आहे. यासाठी, तज्ज्ञ तणावग्रस्त व्यक्तींनी सकारात्मक विचारसरणी ठेवण्याचा सल्ला देत  आहे, तसेच ध्यान ही करावे जेणेकरून नैराश्य येऊ नये.
 
4 मास्क लावल्याने कानात वेदना होणं -कोरोना कालावधीत मास्क लावणे फार महत्त्वाचे आहे आपण मास्कचा वापर करून हा विषाणू टाळू शकता.मास्क लावल्याने लोकांना अनेक अडचणींना सामोरी जावे लागत आहे. त्यापैकी एक आहे कानात वेदना होणं. बऱ्याच काळ मास्क लावून कानात दुखत आहे. 
 
5 त्वचेची समस्या- कोरोनाच्या काळात मास्क लावणे हा एकमेव उपाय आहे जो आपल्याला या विषाणूपासून दूर ठेवू शकतो. लोक या सह काही अडचणींना सामोरी जात आहे जास्त काळ मास्क लावल्याने त्वचेवर मुरूम ,पुरळ होत आहे चेहऱ्यावर लालसर डाग मुरूम,सूज येणं,पुरळ येणं सारख्या समस्या उद्भवत आहे. 
 
6 श्वासोच्छवासाची समस्या - कोरोनाव्हायरस टाळण्यासाठी बराच काळ मास्क लावल्याने लोकांना  श्वासोच्छ्वास, डोकेदुखी, जीव घाबरा होणं, डोळ्यासमोर अचानक अंधारी येणं सारख्या त्रासाला सामोरी जावे लागत आहे. 
 
7  हॅन्ड सेनेटाईझर ने त्रास होणं -सॅनिटायझरमध्ये, ट्रायक्लोझन नावाचे एक रसायन आहे जे हाताची त्वचा शोषून घेते. त्याच्या अत्यधिक वापरामुळे, हे रसायन आपल्या रक्तप्रवाहाद्वारे आपल्या त्वचेमध्ये मिसळले जाते. रक्तामध्ये मिसळल्यानंतर ते आपल्या स्नायूंच्या ऑर्डिनेशन चे  नुकसान करते 
सेनेटाईझर मध्ये सुवास येण्यासाठी  फैथलेट्स नावाची रसायने वापरतात . सॅनिटायझर्स मध्ये याचे प्रमाण जास्त असते ते आपल्यासाठी हानिकारक आहेत. अशा अत्यंत सुगंधित सॅनिटायझर मुळे लिव्हर, किडनी , फुफ्फुस आणि प्रजनन प्रणालीचे नुकसान होते.
 
* सॅनिटायझरमध्ये अल्कोहोलच्या अत्याधिक प्रमाणामुळे याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होऊ शकतो, विशेषत: मुलांनी ते गिळल्यावर. 
* बर्‍याच संशोधनाच्या मते, त्याचा जास्त वापर केल्यास मुलांची प्रतिकारशक्ती कमी होते.