शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: रविवार, 9 मे 2021 (17:04 IST)

शरीर अशा प्रतिक्रिया का देत कारणे जाणून घ्या

why are our body resopnding like that health tips in  marathi
कधी थंडीमुळे शहारे येणं तर कधी शिंक येणं, कधी खाज येणं कधी थकवा येणं कधी कंटाळा येणं या सर्व प्रतिक्रिया सर्वांसह होतात. परंतु आपल्याला हे माहिती आहे का की आपले शरीर अशी प्रतिक्रिया का देत ? चला तर मग जाणून घेऊ या.  
 
* शहारे येणं-आपल्याला थंडी किंवा भीती वाटत असल्यास शहारे येणं ही सामान्य बाब आहे. आपल्या त्वचावरील केस एक मऊ उबदार आवरण बनवतात. या मुळे त्वचेवर त्याचा प्रभाव पडत नाही. 
 
* खाज येणं - एखाद्या कीटक किंवा डास चावल्यावर शरीरात खाज होते. आपले शरीर त्वचा आणि मेंदू ला संकेत देतात की काही तरी चुकीचे घडत आहे ते थांबविणे आवश्यक आहे. याची प्रतिक्रिया आपण खाजवून देतो. 
 
* घाम येणं - धावल्यावर,उन्हात असताना,पोहताना,व्यायाम करताना घाम येतो .घाम येणं हे संकेत देत की शरीरातील तापमान वाढले आहे. तापमानाला थंड करण्याची गरज आहे. घाम निघाल्यावर आपल्याला थंड जाणवतं.  
 
* जांभाळी येणं- हे आळस पणा चे सूचक आहे ही एक प्रतिक्रिया आहे जे आपल्या शरीराला सचेत करते की सावध राहायचे आहे. जांभाळी घेतल्यावर शरीरात कार्बन डाय ऑक्साईड आणि ऑक्सिजनची देवाण घेवाण होते. आपण अतिरिक्त ऑक्सिजन घेऊन कार्बन डाय ऑक्साईड सोडता जे आपल्याला जागृत ठेवते.  
 
* शिंका येणं-जर आपल्याला सतत शिंका येत असतील, तर याचा अर्थ आहे की आपल्या नाकात काही तरी अवांछित आहे जे हानिकारक आहे ते बाहेर काढण्यासाठी मेंदू संकेत देत जर आपल्याला सर्दी असेल तर नाकात जमा होणार श्लेष्मा जंतूंना आत प्रवेश करण्यास प्रतिबंधित करतो. 
 
* रडणे- रडल्यामुळे डोळे स्वच्छ होतात आणि दृष्टी वाढते.जेव्हा आपण अत्यंत संवेदनशील असतो आणि आपली अस्वस्थता व्यक्त करण्यास अक्षम असतो तेव्हा आपण रडतो. ही प्रक्रिया एखाद्या समस्येकडे निर्देशित करते या व्यतिरिक्त जास्त तणाव आल्यावर रडल्याने तणाव मुक्त होण्यास मदत मिळते. 
 
* लाजणे - लाज ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. याचा अर्थ असा की आपले रक्त परिसंचरण वाढत आहे आणि पुरेसा ऑक्सिजन शरीराच्या अवयवांपर्यंत पोहोचत आहे. या व्यतिरिक्त,एड्रि‍नेलिन हार्मोन बाहेर पडताना हृदयाची धडधड वाढते तेव्हासुद्धा लालसरपणा आणि लाज यासारख्या संवेदना चेहर्‍यावर दिसतात.