शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शनिवार, 8 मे 2021 (18:15 IST)

कोरोनाची भीती इतर आजारांना आमंत्रण ,तज्ञांचा सल्ला जाणून घ्या

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्याप कायम आहे. हा साथीचा रोग रोखण्यासाठी निरंतर प्रयत्न केले जात आहेत. परंतु वाढती प्रकरणे आणि मृत्यूच्या आकडेमोडीसमोर रूग्णांची संख्या दररोज बघायला मिळत नाही. या विषाणूची भीती लोकांवर अधिक वर्चस्व गाजवू लागली आहे. अशा प्रकारे, एका आजारासह दुसरा आजार होण्याची भीती असते. या गंभीर परिस्थितीत कोरोनाचा कसा सामना करावा? कोरोनाची भीती मनामधून घालविण्यासाठी काय करावे ? 
 
वेबदुनियाने डॉ.वैभव चतुर्वेदी एमडी (मानसोपचार)यांच्याशी चर्चा केली. 
 
डॉ.वैभव  यांनी सांगितले की कोरोनाचे लक्षण, एखाद्याला कोरोना होणं,आयसीयू मध्ये भरती होणं ,अशा बातम्या ऐकून लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. जरी तो आपल्या घरात निरोगी आहे. लोकांना ही भीती असते की त्यांना कोरोना होणार तर नाही आणि जरी झाला तर मी दगावणार तर नाही.सामान्य भाषेत याला एन्जायटी डिसऑर्डर म्हणतात. शिंकल्यावर देखील लोक घाबरतात. असा विचार मनात येतो की कोरोना झाला तर मी मरेन .ही भीती मनातून आणि मेंदूतून घालविण्यासाठी काही उपाय आहे ज्यांचे अनुसरण करावे. 
1 पुरेशी झोप घ्या. सकाळी उठल्यावर योगा आणि व्यायाम करा. 
 
2 स्वतःला काही क्रियाकलापांमध्ये व्यस्त ठेवा. पुस्तके वाचा,आपले छंद पूर्ण करा. 
 
3 नकारात्मक बातम्यांपासून दूर राहा.     
 
सध्या जे लोक को -मोर्बेडीटी ने वेढलेले आहे ते दगावत आहेत. को- मोर्बेडीटी म्हणजे मधुमेह,ह्रदयरोग ,थॉयराइड,उच्च रक्तदाब असलेले रुग्ण  मृत्युमुखी होत आहे. बऱ्याच वेळा प्रकरणे अधिक गंभीर स्थितीत नसतात. या टप्प्यावर सकारात्मक अहवाल असल्यास आपण लवकर बरे होऊ शकता.  
 
कोविड अहवाल सकारात्मक आला की भीतीवर मात कशी करावी?
 
ही साथीच्या आजाराची वेळ आहे. कोणताही देश या आजारापासून सुटलेला नाही. जेवढा धोका दुसऱ्यांना आहे तेवढाच धोका आपल्याला देखील आहे. आपण सकारात्मक आलात आणि आपण मराल असं काही नाही.तथापि, लसीकरणानंतर मृत्यूचे प्रमाणही कमी झाले. 
 
साथीच्या रोगाची तिसरी लाट येणार आहे याला घेऊन मनात भीती आहे काय केले पाहिजे?
हा साथीचा आजार स्पॅनिश फ्लू चे अनुसरण करत आहे त्यात देखील तीन लाटा आल्या होत्या नंतर तो रोग नाहीसा झाला. साथीचा रोग असाच असतो त्याला घाबरून जायचे नाही. स्वतःला कामांमध्ये व्यस्त ठेवा. 
 
 24 तास कोरोनाची भीती वाटल्यावर काय करावे ? एखादा आजार होऊ शकतो का? 
घाबरणे काही काळापर्यंत ठीक आहे परंतु जर आपल्याला 24 तास भीती वाटत असेल तर तो एक मानसिक आजार आहे. या साठी आपण  मनोचिकित्सकाची मदत घ्यावी. 
होय, योग्य वेळी उपचार न घेतल्यास मानसिक आजार इतर आजारांना कारणीभूत ठरू शकतात. जसे - उच्च रक्तदाब, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग. जेव्हा जास्त मानसिक ताण असतो तेव्हा आपली प्रतिकारशक्ती पातळी देखील कमी होते.
दुसरीकडे, जर सकारात्मक रूग्ण सकारात्मक विचार करत राहिले तर ते लवकर बरे होतील. परदेशी संशोधन हे देखील दर्शवित आहे की ज्या लोकांना कोविड लसीचे दोन्ही डोस लागले होते. त्यांना  कोविडचा धोका कमी झाला आहे. जर कोविड अद्याप दोन्ही डोस घेतल्यावर देखील होत आहे तर ते लवकर बरे होत आहे.