1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: बुधवार, 16 जुलै 2025 (13:29 IST)

तोंडाची चव वाढवणारा हिरव्या मिरचीचा झणझणीत ठेचा

हिरव्या मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी साहित्य आणि कृती 
 
साहित्य: 20 हिरव्या मिरच्या, 20 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा जिरे किंवा जिरेपूड, दोन चमचे दाण्याचे कूट (दरदरीत), मीठ, तेल.
कृती:  पॅनमध्ये थोडेसे तेल गरम करा आणि त्यात हिरव्या मिरच्या थोड्या भाजून घ्या. तुम्ही मिरच्यांचे देठ काढून किंवा न काढता भाजु शकता. मिरच्या भाजून झाल्यावर त्यात शेंगदाणे, लसूण आणि जिरे घालून थोडे भाजून घ्या. भाजलेले मिश्रण थोडे थंड झाल्यावर मिक्सर किंवा खलबत्यात मीठासोबत ठेचून घ्या. व्यवस्थित मिसळून घ्या. ठेचा तयार आहे. तुम्ही तो भाकरी, वडापाव किंवा इतर पदार्थांसोबत खाऊ शकता.
 
दुसरी कृती: हिरव्या मिरच्या आणि लसूण जिरे घालून वाटून घ्या. आता लहान कढईत तेल घालून त्या हे मिश्रण सोडा आणि मीठ घालून परतून घ्या. त्यात दाणेकूट आणि नंतर हवं असल्यास लिंबू पिळा.
टीप: तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीची तीव्रता कमी-जास्त करू शकता.  ठेचा जास्त दिवस टिकवण्यासाठी, तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्या आणि थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवा. तुम्ही ठेचा बनवताना थोडे लिंबू देखील घालू शकता.