संबंधित माहिती
- पितृपक्षात जन्मलेल्या मुलाला किंवा मुलीला अर्थपूर्ण सुंदर नाव द्या
- श्राद्ध पक्षात बनवली जाणारी भोपळ्याची भाजी
- पितृपक्षात पितरांसाठी खीर आणि उडदाच्या डाळीचे वडे का बनवले जातात?
- श्राद्ध पक्षात बनवा तांदळाची खीर रेसिपी
- पितृपक्ष 2025: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहणाचा योग, श्राद्ध विधी कधी करावे हे जाणून घ्या
श्राद्ध पक्षात बनवले जाणारे भरड्याचे वडे, जाणून घ्या रेसिपी
श्राद्ध पक्षात सात्विक पदार्थ बनवले जातात, आणि भरड्याचे वडे हा एक पारंपरिक, सात्विक आणि चवदार पदार्थ आहे जो या काळात बनवला जाऊ शकतो.
साहित्य-
दोन वाटी- जाड तांदूळ
एक वाटी- उडदाची डाळ
एक वाटी- हरभर्याची डाळ
मीठ
तिखट
हळद
मिरची पेस्ट
तेल
पाणी
कृती-
सर्वात आधी उडदाची डाळ, हरभरा डाळ आणि तांदूळ या डाळी भाजून गिरणीतून भरडा काढावा. आता एका भांड्यात हे पीठ घेऊन आता या पिठात मीठ, तिखट, हळद, आवडीप्रमाणे वाटलेली मिरची पेस्ट आणि गरम तेलाचं मोहन घालून कोमट पाण्याने पीठ भिजवावं. आता हे मिश्रण प्लास्टिकवर थापून वडे बनवावे मध्यभागी भोक पाडून खरपूस तळून घ्यावे.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: श्राद्ध पक्षात बनवा तांदळाची खीर रेसिपी
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: श्राद्ध पक्षात बनवली जाणारी भोपळ्याची भाजी
