शनिवार, 16 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated :लॉस एंजिलिस , मंगळवार, 27 डिसेंबर 2016 (11:36 IST)

ट्विटरवर उडाली ब्रिटनी स्पीयर्सच्या मृत्यूची अफवा

एका सनसनीखेज घटनाक्रमात सोनी म्युझिक ग्लोबलचे ट्विटर एकाउंट हॅक केले आणि पॉप स्टार ब्रिटनी स्पीयर्सच्या मृत्यूबद्दल खोटे ट्विट केले. हॅक करण्यात आलेल्या ट्विटरपानावर सोमवारी पहाटे दोन संदेश जारी करण्यात आले.  
 
पहिल्या ट्विटमध्ये म्हटले, 'ईश्वर ब्रिटनी स्पीयर्सच्या आत्मेला शांती दे.' त्यानंतर एक अश्रूपूर्ण इमोजी आणि हॅशटैगच्या माध्यमाने लिहिण्यात आले की ईश्वर ब्रिटनी स्पीयर्सच्या आत्मेला शांती दे 1981-2016।.    
 
दुसरे ट्विट सात मिनिटानंतर आले ज्यात लिहिले होते, 'अपघातात ब्रिटनी स्पीयर्सचा मृत्यू झाला आहे. आम्ही तुम्हाला लवकरच या बाबद अधिक माहिती देण्याचा प्रयत्न करू. आरआयपी ब्रिटनी.'
 
या ट्विट्स नंतर ब्रिटनीचे प्रबंधक एडम लेबेर यांनी सीएनएनला सांगितले की ब्रिटनी स्वस्थ्य आणि ठीक आहे.