सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 20 एप्रिल 2023 (12:23 IST)

प्रसिद्ध पॉप स्टारचे वयाच्या 25 व्या वर्षी निधन

K Pop death प्रसिद्ध पॉप स्टार आणि अॅस्ट्रो सदस्य मूनबिन यांनी वयाच्या 25 व्या वर्षी निरोप घेतला आहे. 
 
मनोरंजन न्यूज आउटलेट सूम्पीनुसार के-पॉप बॉय बँड अॅस्ट्रो सिंगर मून बिन बुधवारी त्याच्या घरी मृतावस्थेत आढळला. ही बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.
 
वृत्त आउटलेटने म्हटले आहे की सोल गंगनम पोलिस स्टेशनने पुष्टी केली की मून बिनचे मॅनेजर यांना पॉप स्टारला 19 एप्रिल रोजी सोलच्या गंगनम जिल्ह्यातील गायकाच्या घरी रात्री 8:10 वाजता मृतावस्थेत आढळले.
 
पोलिस अधिकाऱ्यांप्रमाणे सध्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याच्या शक्यतेवर चर्चा केली जात आहेत पण पोलिसांनी असेही सांगितले की, "मूनबिनने आत्महत्या केली असावी, असे दिसते."
 
कोरियन बँड अ‍ॅस्ट्रोबद्दल बोलायचे तर, हा सहा सदस्यांचा गट होता जो फँटाझिओने बनवला होता, ज्यामध्ये मून बिन, एमजे, जिंजिन, चा उन-ओ, यून सान-हा आणि रॉकी यांचा समावेश होता. मात्र 28 फेब्रुवारी 2023 रोजी रॉकीने ग्रुप सोडला. त्याचवेळी गायक मून बिन यांच्या निधनाच्या बातमीने केवळ कुटुंबीय आणि मित्रपरिवारच नाही तर चाहत्यांनाही धक्का बसला आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर चाहते गायकाला श्रद्धांजली वाहात आहेत.