शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

कुलभूषण जाधव यांचे इराणमधून अपहरण!

कुलभूषण जाधव यांचं इराणमधून अपहरण करण्यात आलं, अशी माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या माजी अधिकाऱ्याने दिली आहे. भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने हेरगिरीच्या आरोपावरुन फाशीची शिक्षा सुनावली आहे. 
 
कुलभूषण यांना बलुचिस्तानातून 3 मार्च 2016 रोजी अटक करण्यात आली, असा दावा पाकिस्तान सातत्याने करत आहे. मात्र आता आयएसआयच्या माजी अधिकाऱ्याने केलेल्या गौप्यस्फोटाने पाकिस्तानचा खोटेपणा पुन्हा एकदा समोर आला.