गिनीज बुकात सर्वात वयोवृद्ध व्यक्तीची नोंद
सध्याच्या घडीला मनुष्याचे आयुष्यमान हळूहळू की होत साठी किंवा सत्तरीपर्यंत आले असून अशात आयुष्याची शंभरी साजरी करणे म्हणजे फार कठिणच. पण 112 वर्षे वय असलेली व्यक्ती हयात असून ही व्यक्ती निरोगी जीवन जगत आहे, असे जर तुम्हाला कोणी सांगितले तर तुमचा नक्कीच विश्र्वास बसणार नाही. मात्र हे खरे आहे! 112 वर्ष वय असलेली व्यक्ती जपानमध्ये असून तिची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. 112 वर्षीय या व्यक्तीचे नाव मसाझो नोनाका असे असून ते उत्तर जपानच्या होक्काइदो या परिसरात राहतात. त्यांचा जन्म 25 जुलै 1905 साली झाला.
नोनाका यांचा पणतू कोकी कुरोहाता म्हणाला, की त्यांनी आरोग्याच्या कुठल्याही सुविधा आतापर्यंत घेतलेल्या नाहीत. त्यांची स्मरणशक्ती अफाट आहे. ते आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत.