सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 30 जुलै 2023 (10:27 IST)

Seattle Shooting: अमेरिकेतील सिएटलमध्ये सामाजिक कार्यक्रमादरम्यान गोळीबार, पाच जखमी

अमेरिकेतील सिएटलमध्ये एका कार्यक्रमादरम्यान गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. या घटनेत पाच जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. गोळीबाराचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सिएटल पोलिसांनी सांगितले की ही घटना शुक्रवारी रात्री 9 वाजता घडली जेव्हा सिएटलमधील रेनिएल अव्हेन्यू साउथवरील पार्किंगमध्ये गोळीबार करण्यात आला. 
 
पोलिसांनी सांगितले की, पार्किंग मध्ये एका सामुदायिक कार्यक्रमादरम्यान गोळीबारझाला . ज्यामध्ये लोक गरजूंना अन्न, कपडे, खेळणी इत्यादींचे वाटप करत होते. यावेळी लोकांवर हल्ला करण्यात आला. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. गोळीबारात सहभागी असल्याच्या संशयावरून पोलीस दोन संशयितांचा शोध घेत आहेत. सिएटलचे पोलिस प्रमुख एड्रियन डायझ यांनी सांगितले की, जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. चार जखमींना हार्बरव्ह्यू मेडिकल सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे तर एका जखमीवर घटनास्थळी उपचार करण्यात आले आहेत.
 


Edited by - Priya Dixit